Thursday, May 9, 2024
Homeक्रीडाWorld Cup 2023IND vs AUS: ऑस्ट्रेलियाविरुद्ध आपल्याला सतर्क राहावे लागेल, फायनलआधी युवराज सिंहचे विधान

IND vs AUS: ऑस्ट्रेलियाविरुद्ध आपल्याला सतर्क राहावे लागेल, फायनलआधी युवराज सिंहचे विधान

मुंबई: आयसीसी क्रिकेट विश्वचषक २०२३चा फायनल सामना १९ डिसेंबरला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सामना खेळवला जाणार आहे. या महामुकाबलासामन्याआधी २०११च्या विश्वचषक चॅम्पियन युवराज सिंहने सांगितले की २०११प्रमाणेच यावेळेसही टीम इंडिया सामना जिंकेल. भारताला एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रित करावे लागेल ती म्हणजे सुरूवातीचे तीन विकेट लवकर पडू नयेत. सोबतच त्याने रोहित शर्माच्या नेतृत्वाचे कौतुक केले.

युवराज म्हणाला, यावेळेस इंडिया खूपच छान खेळत आहे. मात्र ऑस्ट्रेलिया सुरूवातीला चांगली खेळली नाही मात्र ते फायनलला पोहोचले. यावेळेस ऑस्ट्रेलियाला जिंकणे कठीण वाटते. टीम इंडिया जसा परफॉर्मन्स देत आहे ते पाहता कोणतीही गडबड होणार नाही असे दिसते.

टीम इंडियाला हे लक्षात ठेवावे लागेल की आपल्यासमोर ऑस्ट्रेलिया आहे जे फायनलचा प्रेशर चांगल्या पद्धतीने हँडल करू शकतात त्यांनी अनेक फायनलचे सामने जिंकले आहेत.

युवराज पुढे म्हणाला, इंडियाचा परफॉर्मन्स वर्ल्डकपमध्ये असा सुरू आहे की सर्व संघ घाबरलेले आहेत. शुभमन गिल आणि रोहित शर्मा यांनी चांगली सुरूवात करून दिली तर स्कोर ३५० ते ४०० पर्यंत पोहोचत आहे. जर आपली सलामीची जोडी चांगली कामगिरी करत असेल तर आपण खेळात चांगली आघाडी घेऊ शकतो. जर सुरूवातीचे तीन फलंदाज लवकरच बाद झाले तर आपल्यावर दबाव येऊ शकतो. हे अनेकदा आमच्यासोबत झाले आहे. जर असे नाही झाले तर भारताला हरवणे कठीण आहे.

रोहित शर्माची बॅटिंग कमालीची आहे. ते जर ४० बॉल खेळतील तर आरामात ७०-८० धावा करतील. जर ते १०० बॉल खेळले तर सहज २०० धावा करतील. ते टीम प्लेयर आहेत. त्यांच्यासाठी संघ आधी आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -