Wednesday, May 1, 2024
Homeक्रीडाआयसीसी महिला वनडे वर्ल्डकपचे वेळापत्रक जाहीर

आयसीसी महिला वनडे वर्ल्डकपचे वेळापत्रक जाहीर

भारताची सलामी पाकिस्तानशी

दुबई (वृत्तसंस्था): आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) महिला वनडे वर्ल्डकप २०२२ स्पर्धेचे वेळापत्रक बुधवारी जाहीर केले आहे. मिताली राजच्या नेतृत्वाखालील भारताची सलामी परंपरागत प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध ६ मार्चला होईल. यजमान न्यूझीलंड आणि वेस्ट इंडिज यांच्यातील लढतीने (४ मार्च) विश्वचषक स्पर्धेला प्रारंभ होईल.

न्यूझीलंडमध्ये ३१ दिवस रंगणाऱ्या वनडे वर्ल्डकप स्पर्धेत एकूण ३१ सामने खेळवले जाणार असून त्यात आठ संघ सहभागी होणार आहेत. पहिला उपांत्य सामना वेलिंग्टन येथे ३० मार्च रोजी तसेच दुसरा उपांत्य सामना ३१ मार्चला होईल. विजेतेपदाचा सामना ३ एप्रिलला रंगेल. अंतिम लढत ख्राइस्टचर्चवर होईल. वर्ल्डकप स्पर्धा राऊंड रॉबिन स्वरूपात खेळली जाईल, जिथे प्रत्येक संघाला इतर प्रत्येक संघाशी स्पर्धा करावी लागेल आणि गुणतालिकेतील अव्वल चार संघ उपांत्य फेरीत प्रवेश करतील.पहिल्या क्रमांकाच्या संघाला तिसऱ्या क्रमांकाच्या संघाशी आणि दुसऱ्या क्रमांकाच्या संघाला चौथ्या क्रमांकाच्या संघाचा सामना करावा लागेल.

ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका आणि भारत हे संघ आयसीसी महिला चॅम्पियनशिप २०१७-२० मधील त्यांच्या स्थानांनुसार वर्ल्डकप स्पर्धेसाठी थेट पात्र ठरले आहेत. यजमान असल्यामुळे न्यूझीलंड संघ आपोआप पात्र ठरला.

भारताच्या लढती

६ मार्च वि. पाकिस्तान टौरंगा
१० मार्च वि. न्यूझीलंड हॅमिल्टन
१२ मार्च वि. वेस्ट इंडिज हॅमिल्टन
१६ मार्च वि. इंग्लंड टौरंगा
१९ मार्च वि. ऑस्ट्रेलिया ऑकलंड
२२ मार्च वि. बांगलादेश हॅमिल्टन
२७ मार्च वि. दक्षिण आफ्रिका ख्राइस्टचर्च

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -