Sunday, May 5, 2024
Homeमहाराष्ट्रकोकणमहाराजांचा पुतळा योग्य ठिकाणी बसविण्यासाठी किती वेळ घेणार?

महाराजांचा पुतळा योग्य ठिकाणी बसविण्यासाठी किती वेळ घेणार?

आमदार नितेश राणे यांचा राज्य सरकारला सवाल

कणकवली (प्रतिनिधी) : छत्रपती शिवाजी महाराज यांच्यापेक्षा आम्हाला कोणी मोठे नाही. त्यांचा पुतळा योग्य ठिकाणी बसविण्यासाठी किती वेळ घेणार? महाराजांचा अपमान होईपर्यंत आम्ही हात बांधून गप्प बसणार नाही, असा इशारा आमदार नितेश राणे यांनी दिला आहे.

जर आम्ही रातोरात छत्रपती शिवरायांचा पुतळा हलवला आणि योग्य जागी बसवला, तर आमच्यावर गुन्हे दाखल करायचे नाहीत, असा इशारादेखील आ. राणे यांनी दिला. कणकवली येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात, छत्रपती शिवरायांचा पुतळा नियोजित जागी स्थलांतरित करावा, यासाठी शहर भाजपच्या वतीने सुरू असलेल्या उपोषणाला भाजप आमदार नितेश राणे यांनी भेट देऊन पाठिंबा दिला. यावेळी आ. राणे यांनी प्रशासन आणि सरकारला व पालकमंत्री सामंत यांना चांगलेच धारेवर धरले.

ते म्हणाले, पालकमंत्री उदय सामंत यांनी कणकवलीतील सर्व्हीस रोडवरील पुतळा स्थलांतरित करण्यासंदर्भात कणकवलीकरांना शब्द दिला होता. पण अद्याप पुतळा स्थलांतर झाला नसल्याने उपोषणाचा पर्याय निवडला. हे औरंगजेबला मानणारे राज्य सरकार आहे. त्यांच्या राज्यात छत्रपती शिवरायांचा सन्मान होईल, अशी अपेक्षा ठेवणे चुकीचे आहे. मात्र आम्ही आमच्या आराध्यदैवताचा अपमान होऊ देणार नाही.

छत्रपतींसमोर आमच्या पदाची आम्हाला चिंता नाही. पुतळा स्थलांतरित करण्याच्या मुद्द्यावरून जर जिल्ह्यात तांडव निर्माण झाले, तर आमची त्याला तयारी आहे. असा इशारादेखील आ. राणे यांनी दिला. भाजप शहराध्यक्ष अण्णा कोदे व त्याच्या सहकाऱ्यांनी उपोषण सुरू केले आहे. यावेळी भाजप तालुकाध्यक्ष संतोष कानडे, प्राची कर्पे, प्रज्ञा ढवण, सुशील सावंत, मेघा गांगण, राजश्री धुमाळे, साक्षी वाळके, आदी उपस्थित होते. यावेळी पुतळ्याच्या प्रस्तावित जागेची देखील आ. राणे यांनी पाहणी केली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -