Monday, May 6, 2024
Homeदेशताज महालच्या २२ खोल्या उघडण्याची मागणी हायकोर्टाने फेटाळली

ताज महालच्या २२ खोल्या उघडण्याची मागणी हायकोर्टाने फेटाळली

अलाहाबाद : आग्र्यातील ताजमहालच्या २२ खोल्या उघडण्याची मागणी कोर्टाने फेटाळली आहे. या याचिकेवर अलाहाबाद उच्च न्यायालयाने लखनऊ खंडपीठासमोर सुनावणी केली. यावेळी उच्च न्यायालयाने याचिकाकर्त्याला चांगलेच फटकारले. आज तुम्ही ताज महालमधील खोल्या पाहण्यासाठी याचिका दाखल केली, उद्या न्यायाधीशांच्या चेंबरमध्ये जाण्यासाठी परवानगी मागाल. याचिकाकर्त्याने विद्यापीठात जावे, एमए करावे आणि नेट उत्तीर्ण होऊन जेआरएफसाठी पात्र होऊन या विषयावर संशोधन करावे, तेव्हा तुम्हाला एखाद्या विद्यापीठाने रोखले तर न्यायालयात, या असे म्हणत उच्च न्यायालयाने याचिकाकर्त्याला फटकारले.

ताजमहालात बंद असलेल्या २२ खोल्या उघडून त्याची पुरातत्व विभागामार्फत तपासणी करण्यात यावी, अशी मागणी याचिकाकर्त्याने केली होती. त्यावर न्यायाधीश डी. के. उपाध्याय आणि न्यायाधीश सुभाष विद्यार्थी यांच्या खंडपीठाने सुनावणी केली. याचिकेत मागणी करताना म्हटले होते की, देशातील जनतेला ताज महालाबद्दल सत्य जाणून घेण्याचा अधिकार आहे. माहितीच्या अधिकारात याची माहिती मागितली होती, पण ती दिली गेली नाही. न्यायालयाने याचिकाकर्त्याची मागणी फेटाळून लावत जनहित याचिकेचा गैरवापर करू नका, असे म्हणत त्याला चांगलेच सुनावले.

ताज महालात एखादी वस्तू लपवून ठेवली असेल तर त्याची माहिती लोकांना द्यायला हवी. ही जमीन कोणाची आहे हा मुद्दा नाही तर या खोलीत काय आहे हे जाणून घ्यायचे आहे, असेही याचिकाकर्त्याने म्हटले आहे. दरम्यान, उत्तर प्रदेश सरकारची बाजू मांडताना वकिलांनी म्हटले की, या प्रकरणी आग्र्यात खटला सुरु आहे. तसेच याचिकाकर्त्याच्या अधिकारक्षेत्रात हा भाग येत नाही.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -