Sunday, April 28, 2024
Homeताज्या घडामोडीकोरोना काळात आरोग्य भरती आवश्यक होती

कोरोना काळात आरोग्य भरती आवश्यक होती

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे स्पष्टीकरण

मुंबई: कोरोना काळात आरोग्य भरती आवश्यक होती, असे स्पष्टीकरण आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले आहे.
‘मला या ठिकाणी फार स्पष्टपणे सांगायाचं आहे की, कोरोना काळात आरोग्य विभागाच्या सर्व भरती होणं हे राज्याच्या जनतेच्या दृष्टिकोनातून आवश्यक होतं. कॅबिनेटने जाणीवपूर्व निर्णय घेतला की यामध्ये १०० टक्के जागा भराव्यात. त्यामुळे मी मंत्री म्हणून सभागृहाला एवढचं सांगेन की, माझा हेतू एवढाच आहे की या सगळ्या जागा भराव्यात, त्या अत्यंत पारदर्शक पद्धतीने भराव्यात यामध्ये कुठल्याही मुलावर कधीच दोष येता कामा नये. हीच आमची नैतिकता आणि नीतीमत्ता आहे, असे आरोग्य विभागीतील पद भरतीच्या मुद्यावर सरकारची भूमिका स्पष्ट केली.

“ गट ड संवर्गातील पदांच्या भरतीबाबत ज्या काही गोष्टी घडल्या, त्या खरोखर नैतिकतेला नीतीमत्तेला कुठेही धरून नाहीत. खरं कलियुग आहे हे या ठिकाणी सिद्ध होण्याचा प्रकार झालेला आहे. आपण म्हणतो जसं कुंपणच शेत खातं, त्या चुका या पद्धतीमध्ये आहेत, त्या पद्धती दुरूस्त करण्याची तयारी निश्चितपणे आहे. परंतु, आरोग्यमंत्री म्हणून माझा हेतू हा स्पष्टपणे मला सभागृहला सांगायचा आहे की, जनतेच्या हितासाठी जागा भराव्यात हा दृष्टीकोन मंत्र्याचा असणं चूक नाही. जी कार्यपद्धती आहे परीक्षा घेण्याची किंवा देण्याची ती कार्यपद्धती अवलंबून ती परीक्षा लवकर आणि पारदर्शक पद्धतीने व्हावी, यासाठी आपण प्रयत्न करणं यामध्ये गैर नाही. यामध्ये जे दोषी असतील, जे दोषी आज देखील पोलिसांना आढळलेले आहेत. तपास सुरू आहे, त्यांना पोलिसांनी जो दोष सांगितलेला आहे. जे जे लोक दोषी असतील त्यांना कठोरातील कठोर शिक्षा करायला कुठलीही अडचण नाही. आरोग्य विभाग आणि उपमुख्यमंत्र्यांनी देखील स्पष्टपणे सांगितलं की, जे कुणी दोषी असतील त्यापैकी कोणालाही पाठीशी घालण्याचं काम महाविकास आघाडीचं सरकार करणार नाही.” असंही यावेळी टोपेंनी बोलून दाखवलं.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -