Sunday, April 28, 2024
Homeमहाराष्ट्रकोकणरायगडमध्ये साडेचार लाख बालके, विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी सुरू

रायगडमध्ये साडेचार लाख बालके, विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी सुरू

अलिबाग (प्रतिनिधी) : रायगड जिल्हा परिषदेच्या विविध विभागाच्या समन्वयाने जागरूक पालक-सुदृढ बालक मोहिमेला सुरुवात करण्यात आली आहे. या मोहिमेत १८ वर्षांपर्यंतच्या सुमारे ४ लाख ६१ हजार विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे यांच्या मार्गदर्शनाखाली, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील सदर मोहिम राबवित आहेत.

शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये विविध आजारामुळे त्यांच्या शैक्षणिक प्रगतीवर परिणाम होत असतो. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांसह बालकांच्या आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करणेसाठी जिल्हा परिषदेच्या विविध विभागाच्या समन्वयाने जागरूक पालक सुदृढ बालक मोहिम हाती घेण्यात आली आहे. सदरील मोहीम पुढील दोन महिने राबविली जाईल. मोहीम यशस्वी करण्यासाठी २५७ आरोग्य पथके तयार करण्यात आली आहेत. पथकांमध्ये राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमातीला ३० वैद्यकीय अधिकारी, १६१ समुदाय आरोग्य अधिकारी, ६६ प्राथमिक आरोग्य केंद्रातील व ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी, नेमून दिलेल्या कार्यक्षेत्रातील अंगणवाडी आणि शाळांना भेटी देऊन आरोग्य तपासणी करतील. यामुळे विद्यार्थी आणि मुलांचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होईल. परिणामी चांगल्या आरोग्याचा फायदा त्यांना शैक्षणिक प्रगतीसाठी होईल. रायगड जिल्ह्यात ही मोहीम राबवण्यात येणार आहे. यात १८ वर्षांपर्यंतच्या मुले आणि विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी केली जाणार आहे. या मोहिमेत पालकांचेही प्रबोधन करून त्यांना मार्गदर्शन केले जाणार आहे.

२ महिने चालणार आरोग्य तपासणी

जिल्ह्यातील एकूण २ हजार ५२८ शासकीय, ३८५ निमशासकीय आणि २४६ खासगी शाळांमधील ३ लाख २१ हजार बालकांची तपासणी केली जाणार आहे. याशिवाय ३ हजार ५९ अंगणवाड्या आणि ७२ खासगी नर्सरीमधील १ लाख ४० हजार बालकांची तापसणी होईल. आशाप्रकारे आगामी दोन महिन्यांत जिल्ह्यातील एकंदर ४ लाख ६१ हजार बालके व विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी केली जाणार आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -