Friday, April 26, 2024
Homeताज्या घडामोडीगुढीपाडव्याच्याच दिवशी सोन्याचा भाव घसरला, जाणून घ्या आजचा भाव

गुढीपाडव्याच्याच दिवशी सोन्याचा भाव घसरला, जाणून घ्या आजचा भाव

मुंबई: गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर सोन्यासारखी बातमी. एक दिवस आधी तब्बल साठ हजारांवर गेलेला सोन्याचा भाव आज घसरला. त्यामुळे या मुहूर्तावर सोने खरेदी करणाऱ्यांमध्ये उत्साह असल्याचे चित्र आहे.

आज बुधवारी शुद्ध सोन्याच्या दरात ५७४ रुपयांची घट झाली आहे. इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या माहितीनुसार, शुद्ध सोन्याचा दर आज प्रति १० ग्रॅम ५८ हजार ६१४ रुपयांवर खुला झाला आहे. हा दर काल मंगळवारी प्रति १० ग्रॅम ५९ हजार १८८ रुपयांवर होता. तर गेल्या सोमवारी सोन्याच्या दराने ६० हजारांचा टप्पा पार केला होता.

सोन्याचा आजचा प्रति १० ग्रॅमचा दर

२४ कॅरेटचा दर ५८ हजार, ६१४ रुपये
२३ कॅरेट ५८ हजार ३७९ रुपये
२२ कॅरेट ५३ हजार ६९० रुपये
१८ कॅरेट ४३ हजार ९६१ रुपये
१४ कॅरेटचा दर ३४ हजार २८९ रुपये इतका आहे.
चांदीचा दर प्रति किलो ६८ हजार २५० रुपये इतका आहे.

१ एप्रिलपासून ४ अंकी हॉलमार्किंग पूर्णपणे बंद

नव्या नियमांनुसार १ एप्रिलपासून ६ अंकी अल्फान्यूमेरिक हॉलमार्किंग शिवाय सोन्याची विक्री होणार नाही. आधार कार्डवर ज्याप्रमाणे १२ आकडी कोड असतो, त्याच प्रमाणे सोन्यावर ६ अंकी हॉलमार्क कोड असेल. त्याला हॉलमार्क यूनिक आयडेंटिफिकेशन क्रमांक (HUID) म्हटले जाते.

हा आकडा अल्फान्यूमेरिक म्हणजे असा असू शकतो- AZ4524. या क्रमांकाद्वारे सोने किती कॅरेटचे आहे हे शोधणे शक्य होईल. देशभरात सोन्यावर ट्रेड मार्क देण्यासाठी ९४० केंद्र स्थापन करण्यात आली आहेत. आता ४ अंकी हॉलमार्किंग पूर्णपणे बंद होणार आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -