Sunday, April 28, 2024
Homeमहत्वाची बातमीकामाला लागा; निवडणुकांसाठी पवारांचे आदेश

कामाला लागा; निवडणुकांसाठी पवारांचे आदेश

मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शरद पवार यांनी स्वतः सूत्र हातात घेतली असून, कोणता पक्ष सोबत येईल, नाही येईल याचा विचार न करता कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. मुंबईतल्या वाय बी चव्हाण सेंटरमध्ये आज शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. त्यावेळी वरील आदेश देण्यात आले आहेत. या बैठकीला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार, छगन भुजबळ उपस्थित होते. मुसळधार पावसातही मोठ्या संख्येने पदाधिकारी हजर होते.

शिवसेना आणि राष्ट्रवादीची शक्ती एकत्र आल्यास चित्रं वेगळे दिसेल असे वक्तव्य पवारांनी काल केले होते आणि आज मात्र त्यांनी कार्यकर्त्यांना कोणावरही विसंबून न रहाता महापालिका निवडणुकीसाठी सज्ज रहाण्यास सांगितले आहे.

शरद पवार मुंबईत स्वतः फिरून पक्षाला वेळ देणार असून, मुंबई महापालिकेसाठी सर्व ठिकाणी तयारी करण्याचे आदेश शरद पवार यांनी दिले आहेत. प्रत्येक वॉर्डमधील परिस्थितीचा अहवाल पवार यांना देण्यात येणार आहे. मुंबई महापालिका निवडणुकीत स्वतः आपण लक्ष देणार असल्याचे शरद पवार यांनी पदाधिकाऱ्यांना आश्वासन दिले आहे.

या बैठकीत शरद पवार यांच्याकडून नवाब मलिक यांचा देखील उल्लेख करण्यात आला. मुंबईत नवाब मलिक यांनी विरोधकांच्या विरोधात आवाज उठवला म्हणून मलिक यांच्यावर कारवाई करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, अद्याप त्यांच्या विरोधात ठोस पुरावे सादर होऊ शकलेले नाहीत, असेही शरद पवार यांनी यावेळी स्पष्ट केले.

या बैठकीत मार्गदर्शन करताना प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुंबई महापालिका निवडणुकीच्या कामाला लागण्याचे पदाधिकाऱ्यांना आदेश दिले. मुंबईतील घराघरात पोहोचा तसेच प्रत्येक वॉर्डमध्ये सदस्य नोंदणी वाढवण्याचा सल्लाही त्यांनी पदाधिकाऱ्यांना दिला.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -