Wednesday, May 1, 2024
Homeमहाराष्ट्रनाशिकTruck Driver Strike : अखेर वाहतूकदारांनी संप घेतला मागे

Truck Driver Strike : अखेर वाहतूकदारांनी संप घेतला मागे

इंधनपुरवठा होणार सुरळीत

नाशिक : नववर्षाच्या (New year) सुरुवातीलाच वाहतूकदार संघटनांनी संप (Truck Driver Strike) पुकारला होता. सरकारने अपघाताबाबत बनवलेल्या कायद्याविरोधात काल जानेवारीच्या पहिल्याच दिवसापासून संप पुकारण्यात आला होता. त्यामुळे उत्तर महाराष्ट्र (North Maharashtra) व मराठवाड्यातील (Marathwada) १२ जिल्ह्यांतील इंधन पुरवठा ठप्प झाला होता. या पार्श्वभूमीवर आज मनमाडच्या पानेवाडी इंधन प्रकल्पात टँकर चालकांसोबत प्रशासनाची बैठक झाली. या बैठकीत तोडगा निघाला असून वाहतूकदारांनी संप मागे घेण्यास होकार दर्शवला आहे.

कालपासून सुरु झालेल्या वाहतूकदारांच्या संपात सुमारे १ हजार ५०० टँकरचालक उतरले होते. त्यामुळे इंधनाबाबत राज्यभरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. यासाठी आज मनमाडच्या पानेवाडी इंधन प्रकल्पात टँकर चालकांसोबत जिल्हाधिकारी जलज शर्मा, पोलीस अधिक्षक शहाजी उमप, प्रकल्प अधिकारी, आरटीओ, पोलीस प्रशासन यांच्यात बैठक पार पडली. यामध्ये वाहतूकदारांनी काम करण्याचे मान्य केले आहे.

कालपासून प्रशासनासोबत झालेल्या तीन बैठका निष्फळ ठरल्या होत्या. मात्र आज जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत तोडगा निघाला आहे. त्यामुळे आता नाशिक, उत्तर महाराष्ट्र व मराठवाड्यातील १२ जिल्ह्यांतील इंधन पुरवठा पूर्ववत होणार असल्याने नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -