Thursday, May 9, 2024
Homeमहाराष्ट्रठाणेअखेर 'त्या' वादग्रस्त राजकीय मंडळाच्या देखाव्याला न्यायालयाची सशर्त परवानगी

अखेर ‘त्या’ वादग्रस्त राजकीय मंडळाच्या देखाव्याला न्यायालयाची सशर्त परवानगी

वादग्रस्त राजकीय देखाव्यामुळे पोलिसांनी केली होती कारवाई

कल्याण : अखेर कल्याण मधील विजय तरुण मित्र मंडळाच्या देखाव्याला न्यायालयाने सशर्त परवानगी दिली आहे. वादग्रस्त राजकीय देखाव्यामुळे कल्याणच्या महात्मा फुले चौक पोलिसांनी गणेशोत्सवाच्या पहाटे देखावा जप्तीची कारवाई केली होती. पोलिसांच्या या कारवाई नंतर मंडळाने घेतली न्यायालयात धाव घेतली होती. याबाबत आज सुनावणी झाली असता न्यायालयाने या देखाव्यातील आक्षेपार्ह संवाद आणि चित्र काढून टाकण्याच्या अटीवर सशर्त परवानगी दिली आहे.

महात्मा फुले चौक पोलीस स्टेशन हद्दीत रामबागेतील विजय तरूण मंडळा कडुन सार्वजनीक गणेशोत्सवात मंडळाच्या मंडपात वादग्रस्त देखावा व ध्वनीचित्रफीत तयार केली होती. त्या संदर्भात महात्मा फुले चौक पोलीस ठाण्याकडून विजय तरूण मंडळा विरूध्द गुन्हा दाखल करून सदर वादग्रस्त देखावा पोलीसांनी जप्त करून कारवाई केली होती. याबाबत विजय तरूण मंडळाने उच्च न्यायालयात याचीका दाखल केली होती. या याचीकेवर आज सुनावणी झाली. या सुनावणी मध्ये विजय तरूण मंडळाने आक्षेपार्ह देखावा (दृश्य) तसेच ध्वनीचित्रफिती मधील आक्षेपार्ह संवाद काढुन टकण्याचे मान्य करून तसे उच्च न्यायालयास समक्ष सांगीतले आहे.

त्यामुळे या विजय तरूण मंडळ यांनी सार्वजनीक गणेशोत्सवाकरीता तयार केलेला वादग्रस्त देखावा (दृश्य) व ध्वनीचित्रफित मधील आक्षेपार्ह संवाद काढुन टाकणार असल्याने त्या अटी व शर्तीचे अधिन राहुन विजय तरूण मंडळाला महात्मा फुले चौक पोलिसांनी परवानगी दिली असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक होनमाने यांनी दिली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -