Monday, May 6, 2024
Homeमहाराष्ट्रकोकण‘उपमुख्यमंत्र्यांनी जिल्हा परिषदेचे ते ६५ कोटी दिले नाहीत’

‘उपमुख्यमंत्र्यांनी जिल्हा परिषदेचे ते ६५ कोटी दिले नाहीत’

  • पालकमंत्र्यांचाही मनमानी कारभार;
  • जिल्हा नियोजन सभेवर बहिष्कार

सिंधुनगरी (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे परत गेलेले विकासकामाचे ६५ कोटी रुपये राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी सिंधुदुर्गात येऊन या जिल्हास देण्याचा शब्द पाळला नाही. सरकार राज्याच्या सत्तेत आल्यापासून राज्याचा आणि जिल्हाचा विकास ठप्प आहे. वादळातील नुकसानभरपाई अजून नाही. रस्त्यांची कामे ठप्प आहेत. ठेकेदाराचे पैसेच न मिळाल्याने रस्ते अपुर्ण आहेत. त्यातच पालकमंत्री उदय सामंत यांची मनमानी सुरुच आहे. जिल्हातील विकास कामांच्या याद्या मंजूर करताना विश्वासात घेतले जात नाहीत, या याद्यांवर केवळ पालकमंत्र्यांचीच सही आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी या याद्यांवर सही करण्यास टाळले आहे. या पालकमंत्र्यांच्या मनमानी कार्यपद्धतीमुळे आपण आजच्या जिल्हा नियोजन समिती सभेवर बहिष्कार घातल्याचे आमदार नितेश राणे यांनी सिंधुनगरी येथील पत्रकार परिषदेत जाहीर केले.

जिल्हा नियोजन समितीची १० जानेवारीनंतर तब्बल पाच महिन्यांनी ही सभा होत आहे. मात्र, पालकमंत्री उदय सामंत यांची सभाशास्त्र व शासन निर्णयाच्या मार्गदर्शक सूचना डावलून मनमानी कार्यपद्धतीबाबत आमदार नितेश राणे यांनी तिव्र नाराजी व्यक्त केली. आ. नितेश राणे यांची या सभेच्या प्रारंभीच पत्रकार परिषद होत भाजपाच्या वतीने राज्य सरकारचा कारभार, खोळंबलेली विकासकामे, तोक्ते चक्रीवादळात झालेली व न मिळालेली नुकसानभरपाई, अर्धवट असलेले रस्ते, ठेकेदारांची देय रक्कम न मिळाल्याने रखडलेल्या रस्तांची कामे, पशू-पक्षी प्रदर्शनात झालेली उधळपट्टी यामुळे जिल्हावासीय नागरिकांना या कारभाराची मोठी झळ बसली आहे, याकडे नितेश राणे यांनी लक्ष वेधले.

खरेतर जिल्हा नियोजन समिती सभेत विकासावर चर्चा होणे अपेक्षीत होते. तब्बल पाच महिन्यांनी सभा घेतांना या सभेची व कामांची कार्यपद्धती पालकमंत्री शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार होत नाही. विकास कामे मंजूर करताना लोकप्रतीनीधीना विश्वासात घेतले जात नाही. ज्या कामांच्या याद्या मंजूर करताना पालकमंत्र्यांची मनमानी आहे. त्यावर त्यांच्याच सह्या आहेत. जिल्हाधिकार्यांच्या सह्या या याद्यांवर नाहीत. त्यांनी त्या करायच्या टाळल्या आहेत. त्यामुळे प्रशासनातील अधिकाऱ्यांनाही पालकमंत्र्यांचा हा मनमानी कारभार मान्य नाही असेही यातून उघड होते असेही त्यांनी स्पष्ट केले. जिल्ह्याच्या पुरहाणी कामाच्या याद्यांही पालकमंत्र्यांनी मनमानी करत ही कामे मंजूर केली. सुस्थितील अन् नादुरुस्त रस्ते याचीही पडताळणी केली नाही. त्यामुळे खरोखरच नादुरुस्त रस्ते दुर्लक्षीत राहीले. याकडेही नितेश राणे यांनी लक्ष वेधले. पुरहाणीचा निधीही अत्यावश्यक असलेल्या रस्त्यांवर खर्च झाला नाही. त्यातही पालकमंत्र्यांनी मनमानी केली, असेही आमदार नितेश राणे म्हणाले.

जनतेच्या पैशांची उधळपट्टी

जिल्हा परिषदेवर सद्या प्रशासक असून, पालकमंत्रयांनी अधिकार्यावंवर दबाव टाकून घाईगडबडीन कृषी पशू-पक्षी प्रदर्शन भरविले. शेतकऱ्यांसाठी हे प्रदर्शन उपयुक्त न ठरता याकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरविली. मे महिन्यात अखेरच्याक्षणी हे प्रदर्शन घाईगडबडीने घेऊन जनतेच्या पैशाची उधळपट्टी केली असेही आ. नितेश राणे यांनी स्पष्ट करीत या कारभाराबाबतही नाराजी व्यक्त केली. या प्रदर्शनात गर्दी जमविण्यासाठी काही अधिकाऱ्यांमार्फत दबाव टाकण्यात आला असून त्याबातही पुरावे असल्याचेही आ. नितेश राणे यांनी सांगितले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -