Saturday, May 11, 2024
Homeक्रीडाRohit Sharma : अकरावीच्या पुस्तकात क्रिकेटर रोहित शर्माचा धडा!

Rohit Sharma : अकरावीच्या पुस्तकात क्रिकेटर रोहित शर्माचा धडा!

तेही चक्क गणिताच्या पुस्तकात; पाहा ‘त्या’ धड्याचा फोटो

चेन्नई : भारतीय स्टार क्रिकेटपटू (Indian Cricketer) रोहित शर्माचा (Rohit Sharma) केवळ भारतातच नाही तर जगभरात खूप मोठा चाहतावर्ग आहे. आपल्या खेळीने त्याने कायमच सर्वांना थक्क करुन सोडले आहे. सर्वसाधारणपणे एखादा खेळाडू किंवा कलाकार त्याच्या निवृत्तीची घोषणा करतो तेव्हा त्याच्याविषयी अभ्यासक्रम किंवा जीवनपट अशा गोष्टी केल्या जातात. मात्र, रोहित शर्मा क्रिकेटमध्ये पूर्ण वेळ सक्रिय असतानाच त्याच्या खेळीवरील एका धड्याचा अकरावीच्या गणिताच्या पाठ्यपुस्तकात (Mathematics Textbook) समावेश करण्यात आला आहे.

सध्या सोशल मीडियावर (Social Media) एक फोटो व्हायरल होत आहे, ज्यामध्ये रोहित शर्माच्या नावाचा धडा शाळेच्या पुस्तकात असल्याचे दिसत आहे. तामिळनाडूतील (Tamilnadu) विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात हा धडा असणार आहे. “Balls and Runs. What a celebration, what a relation! What a function! या मथळ्याखाली रोहित शर्माचा धडा आहे. यामध्ये रोहित शर्माची कामगिरी देण्यात आली आहे.

अकरावीच्या या धड्यामध्ये रोहित शर्माने टी २० क्रिकेटमध्ये ठोकलेल्या शतकाची माहिती देण्यात आली आहे. रोहित शर्माने २०१७ मध्ये श्रीलंकेविरोधात अवघ्या ३५ चेंडूत शतक ठोकलं होतं, त्या खेळीचं वर्णन यामध्ये करण्यात आलं आहे. रोहित शर्माने त्या शतकी खेळीमध्ये १० चौकार आणि १२ षटकार ठोकले होते. ही खेळी विलक्षण कौशल्य आणि सामर्थ्य दाखवणारी होती. या खेळीची माहिती देऊन त्यावर काही गणिताशी संबंधित प्रश्न विचारण्यात आले आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -