Monday, May 6, 2024
Homeमहत्वाची बातमीमुंबै बँक घोटाळा प्रकरणी प्रवीण दरेकरांना क्लीनचिट

मुंबै बँक घोटाळा प्रकरणी प्रवीण दरेकरांना क्लीनचिट

मुंबई : मुंबै बँक घोटाळ्या प्रकरणी भाजप नेते प्रवीण दरेकर यांना दिलासा मिळाला आहे. मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेडच्या २०१५ मधील आर्थिक अनियमितेत प्रकरणात कोणतेही पुरावा सापडले नाहीत, असे सांगत मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने प्रवीण दरेकर यांना क्लीनचिट दिली आहे.

मुंबै बँकेच्या अध्यक्ष, संचालक आणि पदाधिकाऱ्यांनी पदाचा दुरुपयोग करून आणि बनावट कागदपत्रांद्वारे १२३ कोटींचा घोटाळा केल्याचा आहे आरोप प्रवीण दरेकरांवर करण्यात आला आहे. या प्रकरणी दरेकरांवर आरोप केल्यानंतर सुनावणी सुरू होती. यामध्ये त्यांना दिलासा मिळाला आहे.

मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने मुख्य महानगर दंडाधिकारी कोर्टात नुकतेच आपले आरोपपत्र दाखल केले. या आरोपपत्रात दहा मजूर संस्थांना आरोपी केले आहे. परंतु प्रवीण दरेकर आणि इतर सहभागाबाबत कुठलेही पुरावे सापडले नसल्याचा उल्लेख करत त्यांना क्लीन चीट देण्यात आली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -