Saturday, May 11, 2024
Homeमहाराष्ट्रठाणेChinmay Mandlekar : रंगभूमी दिनानिमित्त चिन्मय मांडलेकरने नाट्यरसिकांना दिली 'ही' खास भेट

Chinmay Mandlekar : रंगभूमी दिनानिमित्त चिन्मय मांडलेकरने नाट्यरसिकांना दिली ‘ही’ खास भेट

गेल्या अनेक दिवसांपासून होती उत्सुकता…

मुंबई : मराठी सिनेसृष्टीतील आघाडीचा आणि अष्टपैलू अभिनेता अशी चिन्मय मांडलेकरची (Chinmay Mandlekar) ओळख आहे. आजवर त्याने अनेक मालिका व सिनेमांमधून आपल्या उत्तम अभिनयाने स्वतःचा वेगळा चाहतावर्ग निर्माण केला आहे. मात्र, चिन्मय आणि रंगभूमीचं विशेष नातं आहे. नाटकांतूनच घडलेला चिन्मय आजही रंगभूमीवर अनेक नवनवीन प्रयोग करण्यात सक्रिय असतो. आजच्या मराठी रंगभूमी दिनानिमित्त (Marathi Rangbhumi Din) देखील त्याने नाट्यरसिकांसाठी एक खास भेट आणली आहे.

चिन्मय मांडलेकर लिखित दिग्दर्शित ‘गालिब’ (Galib) हे नवंकोरं नाटक आजपासून प्रेक्षकांच्या भेटीला आहे. आज शुभारंभाचा प्रयोग गडकरी रंगायतन (Gadkari Rangaytan), ठाणे येथे पार पडणार आहे. ‘माझा होशील ना?’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेले गौतमी देशपांडे (Gautami Deshpande) आणि विराजस कुलकर्णी (Virajas Kulkarni) या नाटकामध्ये प्रमुख भूमिका साकारणार आहेत. तसेच अश्विनी जोशी आणि गुरुराज अवधानी हे कलाकार देखील गालिब नाटकात दिसणार आहेत.

चिन्मयने सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करुन गालिब या नाटकाच्या प्रयोगाची माहिती दिली होती. या पोस्टमध्ये त्याने लिहिलं होतं की, ‘तुझ्या डोळ्यात मांजराची धिटाई आणि हरणाचं बावरलेपण दोन्ही आहे, मराठी रंगभूमी दिनी , अर्थात ५ नोव्हेंबरला येत आहे नवीन नाटक-गालिब’. तेव्हापासूनच नाट्यरसिकांना या नाटकाबद्दल उत्सुकता लागून राहिली होती.

गालिब या नाटकाचे पुढील पाच प्रयोगदेखील जाहीर झाले आहेत. या नाटकाचा दुसरा व तिसरा प्रयोग पुण्यात रंगणार आहे. तर पुढील तीन प्रयोग मुंबईत होणार आहेत.

पुण्यातील प्रयोग –

शनिवार ११ नोव्हेंबर दु. १२:३० वा. यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, कोथरूड
शनिवार ११ नोव्हेंबर सायं. ५:३० वा. बालगंधर्व रंगमंदिर, पुणे

मुंबईतील प्रयोग –

सोमवार १३ नोव्हेंबर दु. ४ वा. दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह, विले पार्ले
शनिवार १८ नोव्हेंबर दु. ४ वा. यशवंत नाट्यमंदिर, माटुंगा
रविवार १९ नोव्हेंबर दु. ४ वा. प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृह, बोरिवली

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -