Sunday, April 28, 2024
Homeमहाराष्ट्रठाणेटोमॅटोचे शतक... लिंबूनंतर टोमॅटो महाग

टोमॅटोचे शतक… लिंबूनंतर टोमॅटो महाग

मान्सूनपूर्व पावसाचा फटका

ठाणे (प्रतिनिधी) : लिंबाच्या महागाईनंतर सध्या भाजी मंडईत टोमॅटो भाव खात असून टोमॅटोच्या रेटची स्पर्धा थेट पेट्रोल-डिझेलशी सुरू असल्याचे दिसत आहे. भाजी मंडईत टोमॅटोचे भाव पुन्हा वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

मान्सूनपूर्व पावसामुळे महाराष्ट्रातील पुणे आणि लगतच्या जिल्ह्यांमध्ये भाजीपाला पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या कारणास्तव काढणीही पुढे ढकलण्यात आली. त्याचा परिणाम टोमॅटो पिकावर स्पष्टपणे दिसून येत आहे. भाजी मंडईत सध्या इतर भाज्यांच्या तुलनेत टोमॅटोची आवक नगण्य आहे. त्याचप्रमाणे बाजारात विक्रीसाठी येत असलेल्या टोमॅटोचा दर्जा उत्तम नाही. खराब झालेला किंवा कच्चा टोमॅटो बाजारात विक्री साठी येत आहे.

उत्तम प्रतीच्या टॉमेटोला मागणी चांगली आहे; परंतु टोमॅटो १०० रुपये किलोने विकला जात आहे. गेल्या काही दिवसांपासून भाज्या विशेषतः टोमॅटोच्या किमतीत मोठी वाढ होताना दिसत आहे. अशा स्थितीत पुन्हा एकदा टोमॅटोचे भाव गगनाला भिडू शकतात.

टोमॅटोचा भाव १०० रुपयांच्या पुढे

मागील वर्षी याच काळात टोमॅटो ६० रुपये किलोने विकला जात होता आणि जूनच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत भावात १०० रुपयांनी वाढ झाली होती. यानंतर भाव १० रुपये किलोपर्यंत खाली आले. शेतकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या हंगाम बंद असल्याने टोमॅटो लागवडीखालील जमीन कमी आहे. टोमॅटो काढणीचा हंगाम ऑक्टोबरपासून सुरू होतो. त्यामुळे मान्सूनपूर्व पाऊस आणि कमी लागवडीचा परिणाम भाव वाढण्यावर झाला आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -