Saturday, May 11, 2024
Homeताज्या घडामोडी'बुली बाई'ऍप तयार करणाऱ्यास आसामहून अटक

‘बुली बाई’ऍप तयार करणाऱ्यास आसामहून अटक

नवी दिल्ली : दिल्ली पोलिसांच्या आयएफएसओ युनिटने ‘बुली बाई’ऍप तयार करणाऱ्या मुख्य आरोपीला आसाम येथून अटक केली आहे. डीसीपी केपीएस मल्होत्रा यांच्या पथकाने ही अटक केली आहे. या आरोपीचं नाव नीरज असून हा गिथहब वरून अॅप बनवणारा मुख्य आरोपी आहे. दिल्ली पोलिसांच्या म्हणण्यानुसार, नीरजने बुली बाईला गिथहब अॅपद्वारे बनवले होते.

नीरज हा गिथहबवर बुली बाई अॅप तयार करणारा हा मुख्य आरोपी आहे. आरोपी नीरज बिश्नोई हा सुमारे 21 वर्षांचा आहे. यापूर्वी, दिल्ली महिला आयोगाने ‘बुली बाई’ आणि ‘सुली डील’ अॅप्सवरील आक्षेपार्ह सामग्रीच्या चौकशीच्या संदर्भात या आठवड्याच्या अखेरीस दिल्ली पोलिसांना हजर राहण्यास सांगितले आहे. दिल्ली महिला आयोगाने सोमवारी जारी केलेल्या निवेदनानुसार, ‘गिटहब’ अॅपवर अनेक मुस्लिम महिलांचे फोटो त्यांच्या संमतीशिवाय अपलोड केल्याबद्दल मीडिया रिपोर्ट्सची स्वतःहून दखल घेतली. आयोगाने दिल्ली पोलिसांना हजर राहून ‘सुली डील’ आणि ‘बुली बाई’ प्रकरणात अटक केलेल्यांची यादी करण्यास सांगितले.

दिल्ली महिला आयोगाने जारी केलेल्या आवेदनात म्हणले आहे की, अशा गंभीर प्रकरणातील आरोपींना अटक न होणे हे अस्वस्थ करणारे आहे आणि कायद्याची अंमलबजावणी करणार्या एजन्सींच्या या भूमिकेमुळे महिला आणि मुलींची ऑनलाइन विक्री आणि इतरांना शिक्षा झालेल्यांचे मनोबल वाढले आहे. काही अज्ञात लोकांच्या गटाने ‘गिटहब’ वापरून शेकडो मुस्लिम महिला आणि मुलींचे मॉर्फ केलेले फोटो एका अॅपवर अपलोड केले आहेत आणि ते ‘बुली डील ऑफ द डे’ म्हणून शेअर केले आहेत, असेही निवेदनात म्हटले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -