Sunday, May 5, 2024
HomeदेशBy election Result: पोटनिवडणुकीत ७ पैकी ३ जागांवर भाजपचा विजय, घोसीमध्ये सपाला...

By election Result: पोटनिवडणुकीत ७ पैकी ३ जागांवर भाजपचा विजय, घोसीमध्ये सपाला मोठा विजय

नवी दिल्ली : सहा राज्यांताली ७ विधानसभा जागांवरील पोटनिवडणुकीत(by election) भारतीय जनता पक्षाने (bjp) तीन जागांवर विजय मिळवला आहे. यात त्रिपुरा येथील दोन, उत्तराखंडच्या बागेश्वर विधानसभा जागेचा समावेश आहे. तर झारखंडने डुमरी विधानसभेच्या जागेवर एनडीएच्या उमेदवाराल झारखंड मुक्ती मोर्चाच्या उमेदवाराने चांगली लढत दिली.

केरळच्या पुथुपुल्ली विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवाराने विजय मिळवला आहे. याशिवाय पश्चिम बंगालच्या धुपगुडी विधानसभा मतदार संघात टीएमसीच्या उमेदवाराने विजय मिळवला. तर उत्तर प्रदेशच्या मऊ जिल्ह्यातील घोसी विधानसभा मतदार संघात समाजवादी पक्षाच्या उमेदवार सुधाकर सिंह यांनी मोठा विजय मिळवला आहे.

घोसी विधानसभा पोटनिवडणूक – घोसी विधानसभा पोटनिवडणुकीत सपाचा ऐतिहासि विजय. सपाचे आमदार सुधाकर सिंह यांनी ३४व्या टप्प्यात ४२७६३ मतांनी विजय मिळवला.

धुपगुडी विधानसभा पोटनिवडणूक – तृणमूल काँग्रेसचे उमेदवार निर्मल चंद्र रॉय यांनी धुपगुडी मतदारसंघातून विजय मिळवला.

बागेश्वर विधानसभा पोटनिवडणूक – उत्तराखंडमधील बागेश्वर विधानसभा मतदारसंघातूि भाजपच्या उमेदवार पार्वती दास यांनी विजय मिळवला आहे. त्यांना ३३२४७ मते मिळाली.

झारखंड डुमरी विधानसभा पोटनिवडणूक – डुमरी विधानसभा मतदारसंघातून झामुमोच्या उमेदवार बेबी देवी यांनी एनडीच्या उमेदवाराला हरवले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -