Wednesday, May 1, 2024
Homeक्राईमCyber Crime: सावधान! +92 या क्रमांकांपासून सुरु होणारे कॉल घेऊ नका, सरकारने...

Cyber Crime: सावधान! +92 या क्रमांकांपासून सुरु होणारे कॉल घेऊ नका, सरकारने का दिला इशारा

मुंबई : सध्याच्या घडीला मोबाईल वापरणं मुलभूत गरज बनली आहे. आजकाल सर्वच काम मोबाईल वर होऊन जातात. मोबाईलच्या फायद्यांसह अनेक दुरुपयोगही होत आहेत. मोबाईल्समुळे सायबर क्राईम अधिक प्रमाणात वाढत असल्याने मोबाईल वापरकर्त्यांना दुरसंचार विभागाने सावधानतेचा इशारा दिला आहे. व्हॉट्सअॅपवर +92 सारख्या परदेशी मूळ क्रमांकावरुन कॉल येत असतील तर ते कॉल उचलू नका. या नंबरवरुन येणाऱ्या कॉलमुळे मोठ्या प्रमाणात फसवणूक होत आहे, असे दुरसंचार विभागाने म्हटले.

+92 या नंबरवरुन कॉल आला आणि सरकारी अधिकारी असल्याचे सांगत असल्यास तरी देखील कोणतीही माहिती देऊ नका. टेलिकॉम विभागांची तोतयागिरी करणारे कॉलर मोबाईल वापरकर्त्यांना धमकावत आहेत. त्यांचे नंबर डिस्कनेक्ट केले जातील किंवा काही बेकायदेशीर कामांमध्ये त्यांच्या नंबरचा गैरवापर केला जात आहे. असे सांगून हे सायबर गुन्हेगार निष्पाप नागरिकांना धमकावत आहेत.

दूरसंचार विभाग आपल्या वतीने कोणालाही असे कॉल करण्यासाठी सहमती दिली नाही. त्यांनी लोकांना सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे आणि कोणत्याही गोष्टी शेअर न करण्यास सांगितले. असे कॉल प्राप्त करणाऱ्या लोकांची प्रकरणे वाढत आहेत. सायबर गुन्हेगार आर्थिक फसवणूक करण्यासाठी या कॉलद्वारे लोकांना धमकावून वैयक्तिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे दुरसंचार विभागाने लोकांना सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे. असे कॉल आल्यास कुठलीही माहिती देऊ नका. सायबर क्राइम हेल्पलाइन नंबर 1930 किंवा www.cybercrime.gov.in वर तक्रार करण्याचा सल्ला दुरसंचार विभागाने दिला आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -