Tuesday, May 7, 2024
Homeमहाराष्ट्रसहा हजार विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणातून करणार सक्षम -बीईआय

सहा हजार विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणातून करणार सक्षम -बीईआय

नाशिक (प्रतिनिधी) : भारत एड टेक इनिशिएटिव्ह या भागीदारी संस्थेच्या सहयोगाने चालणाऱ्या २०२५ पर्यंत एक दशलक्षपर्यंत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक परिणाम वाढविण्यासाठी एडटेक उपयोगी ठरू शकते, असा दावा केला आहे. या दाव्यात अनेक अडथळ्यांवर विचार केला गेला आहे. जागरूकता, प्रवेश आणि प्रतिबद्धता, बीईआय प्रभावी आणि न्याय्य एड टेक प्रवेशाद्वारे मुख्यतः आर्थिक कमकुवत गटातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणामध्ये असलेली दरी भरून काढण्याचा प्रयत्न ही संस्था करीत आहे.

सद्य परिस्थितीत ११७,००० विद्यार्थी एड टेक व्यासपीठावर त्यांना हव्या असलेल्या भाषांमध्ये (बंगाली, इंग्लिश, गुजराती, हिंदी, कन्नड, मराठी, ओडिया, तेलुगू आणि उर्दू इ.) बीईआयच्या भागीदारांसोबत ऑनलाइन शिक्षण घेत आहेत. महाराष्ट्रातील अंदाजे २७,००० विद्यार्थी आणि विशेषतः नाशिकमधील ६,००० विद्यार्थी सद्यस्थितीत एड टेकच्या विविध व्यासपीठांवरून कुठल्याही एका बीईआयचा वापर करत आहेत.

गुजरात, महाराष्ट्र, राजस्थान, हिमाचल प्रदेश, दिल्ली, कर्नाटक, बिहार, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशातील शहरी व ग्रामीण भागातील कमी आर्थिक आवक कुटुंबांतील हे ६ ते १७ वर्षे वयोगटातील विद्यार्थी असून इयत्ता १ली ते १२वी मध्ये शिकत आहेत. या पटावर असणाऱ्या विद्यार्थ्यांमधील ४६ टक्के मुली आहेत.

एड टेक प्रवेशाच्या काही समस्या बाजूला ठेवल्या तर विद्यार्थी शैक्षणिक त्रुटी भरून काढण्यासाठी झगडत आहेत. अजीम प्रेमजी विद्यापीठाच्या अभ्यासानुसार, जानेवारी २०२१ मध्ये, पाच राज्यांमधील दुसरी ते सहावी या वर्गातील सोळा हजारपेक्षा अधिक मुलांचा अभ्यास असे सांगतो की, ९२ टक्के विद्यार्थ्यांनी मागच्या वर्षीपासून त्यांची कमीत कमी एका भाषेची क्षमता गमावली आहे. तर ८२ टक्के मुलांनी कमीत कमी एक गणितीय क्षमता गमावली आहे.

भारत एड टेक इनिशिएटिव्ह त्यांच्या एड टेक आणि ना-नफा भागीदारांच्या मदतीने बीईआयमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना स्थानिक भाषेच्या अभ्यासक्रम संबंधित उपायांना प्रवेश आणि उपायांचा वापर करत राहण्यासाठी प्रेरक आणि बांधून ठेवणारे सहकार्य देण्यास समर्थ आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -