Tuesday, May 7, 2024
Homeक्रीडाBCCI: आयपीएलआधी या २ भारतीय खेळाडूंना मिळाले गिफ्ट

BCCI: आयपीएलआधी या २ भारतीय खेळाडूंना मिळाले गिफ्ट

मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२४च्या हंगामाची सुरूवात २२ मार्चपासून होत आहे. पहिला सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि महेंद्र सिंग धोनीच्या नेतृत्वातील चेन्नई सुपर किंग्स यांच्यात रंगत आहे. मात्र त्याआधी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने २ स्टार खेळाडूंना दमदार गिफ्ट दिले आहे.

हे दोन्ही स्टार खेळाडू सर्फराज खान आणि विकेटकीपर ध्रुव जुरेल आहेत. यांना बीसीसीआयने आपल्या कॉन्ट्रॅक्टमध्ये सामील केले आहे. सोमवारी झालेल्या बीसीसीआयच्या अपेक्स काऊंसिल बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. बीसीसीआयने ध्रुव जुरेल आणि सर्फराज यांना ग्रेड सीमध्ये स्थान दिले आहे.

सर्फराज खान यावेळेस आयपीएलमध्ये खेळू शकणार नाही. कारण त्याला कोणत्याच संघाने खरेदी केलेले नाहीय त्याची बेस प्राईज २० लाख रूपये होती. दुसरीकडे ध्रुव जुरेल राजस्थान रॉयल्ससाठी खेळताना दिसेल. एका हंगामासाठी त्याला २० लाख रूपये मिळतील.

कसोटी पदार्पणानंतर दमदार कामगिरी

आता सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमध्ये सामील होताच दोघांना एक कोटी रूपयांचा फायदा झाला आहे. त्यांना सेंट्रल कॉन्ट्रॅक्टनुसार एका वर्षाला एक कोटी रूपये मिळतील. सर्फराज खान आणि जुरेल यांनी नुकतेच आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. दोघांनी इंग्लंडविरुद्धच्या ५ कसोटी सामन्यातून पदार्पण केले होते. दोन्ही खेळाडूंनी जबरदस्त कामगिरी केली होती.

सर्फराजने या कसोटी मालिकेतील तीन कसोटी सामन्यात ३ अर्धशतक ठोकले होते. तर जुरेलने आपल्या दुसऱ्याच कसोटीत ९० आणि ३९ धावांची विजयी खेळी केली होती. त्याला प्लेयर ऑफ दी मॅच निवडण्यात आले होते.

सेंट्रल कॉन्ट्रॅक्टनुसार खेळाडूंना इतके मिळतात पैसे

ग्रेड A+ – ७ कोटी रुपये वार्षिक
ग्रेड A – ५ कोटी रुपये वार्षिक
ग्रेड B – ३ कोटी रूपये वार्षिक
ग्रेड C – १ कोटी रुपये वार्षिक

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -