Sunday, May 19, 2024
Homeक्रीडाPSL 2024: लाईव्ह सामन्यादरम्यान सिगारेट ओढताना दिसला पाकिस्तानी क्रिकेटर, VIDEO व्हायरल

PSL 2024: लाईव्ह सामन्यादरम्यान सिगारेट ओढताना दिसला पाकिस्तानी क्रिकेटर, VIDEO व्हायरल

मुंबई: पाकिस्तान सुपर लीग २०२४च्या फायनलदरम्यान असे काही दृश्य पाहायला मिळाले जे जेंटलमन गेम म्हटले जाणाऱ्या क्रिकेटसाठी लाजिरवाणी बाब आहे. खरंतर पीएसएल चॅम्पियन बनणाऱ्या इस्लामाबाद युनायटेडचा स्टार ऑलराऊंडर इमाद वसीमला लाईव्ह सामन्यादरम्यान ड्रेसिंग रूममध्ये सिगरेट पिताना दिसला.

ड्रेसिंग रूम अशी जागा असते जिथे टीमचे खेळाडू एकत्र बसून चांगल्या गोष्टी करतात मात्र इमाद वसीमने सिगारेट पिण्यास सुरूवात केली.इमादच्या या खराब वर्तणुकीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये दिसत आहे की इमाद वसीम ड्रेसिंग रूममध्ये बसलेला आहे आणि त्याच्या हातात सिगारेट आहे. एकदा ओढल्यानंतर इमादला समजते की कॅमेरा त्याच्यावर आहे. यामुळे तो लगेचच सिगारेट लपवतो आणि हळूच धूर बाहेर काढतो. इमादची ही खराब वर्तणूक कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

 

बॉलिंगमध्ये कमाल

या सामन्यात इमादने बॉलिंगदरम्यान कमाल केली आणि संघाच्या विजयात मोलाचे योगदान दिले. सामन्यात पहिल्यांदा फलंदाजीसाठी उतरलेल्या मुल्तान सुल्तानचे एकूण पाच फलंदाज इस्लामाबाद युनायटेडच्या इमादने बाद केले. त्याने ५ विकेट घेण्यासोबतच ४ विकेट घेताना केवळ २३ धावा दिल्या.

शेवटच्या बॉलवर इस्लामाबादचा विजय

पहिल्यांदा बॅटिंग करताना मुल्तान सुल्तानने २० षटकांत ९ बाद १५९ धावा केल्या. त्यानंतर आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या इस्लामाबाद युनायटेडला शेवटच्या षटकांत ८ धावा हव्या होत्या. या दरम्यान क्रीजवर इमाद वसीम आणि नसीम शाह होते. दोघांनी मिळून ४ बॉलमध्ये ७ धावा केल्या. शेवटच्या दोन बॉलमध्ये १ धाव हवी होती. मात्र नसीम शाह बाद झाला. त्यानंतर हुनैन शाहने शेवटच्या बॉलवर चौकार ठोकत इस्लामाबादला विजय मिळवून दिला.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -