Sunday, April 28, 2024
Homeदेशदहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी अमित शहांचे ऑपरेशन काश्मीर

दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी अमित शहांचे ऑपरेशन काश्मीर

गुप्तचर यंत्रणांच्या मॅरेथॉन बैठका सुरू, डोवलही उपस्थित

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जम्मू -काश्मीरमधील ताज्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी विशेष मोहीम राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अमित शहा यांनी ही मोहीम राबवण्यासाठी दिल्लीहून काश्मीरला एक टीम पाठवली आहे. ही स्पेशल टीम दहशतवाद्यांवर काळ बनून कोसळेल. काश्मीरमध्ये सुरक्षा दलांचे जवान दहशतवाद्यांचा शोध घेत आहेत आणि त्यांना ठार करत आहेत. दुसरीकडे एनआयएचे पथक दहशतवाद्यांना मदत करणाऱ्यांविरोधात कारवाईचा फास आवळत आहे. गुप्तचर विभागाकडून त्यांना माहिती दिली जात आहे. या माहितीवरून दहशतवाद्यांच्या भूमिगत साथीदारांवर आणि अड्ड्यांवर छापे टाकण्यात येत आहेत.

दरम्यान, काश्मीरमध्ये सामान्य नागरिकांवर दहशतवाद्यांचे हल्ले वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गुप्तचर यंत्रणांची मॅरेथॉन बैठक बोलावली असून या बैठकीला भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवलही उपस्थित आहेत. दुपारी २ वाजेपासून ते रात्री १० वाजेपर्यंतपर्यंत म्हणजे सलग आठ तासांहून अधिक काळ ते स्वतंत्र बैठका होत आहेत. राष्ट्रीय सुरक्षा रणनीती परिषदेच्या वार्षिक सभेला ते आधी संबोधित करतील.

या बैठकीत देशाच्या विविध राज्यांचे पोलीस महासंचालक आणि महानिरीक्षक यांच्यासह गुप्तचर विभागाचे प्रमुखही उपस्थित आहेत. निमलष्करी दलाचे प्रमुखही यात सहभागी आहेत. यावेळी परिषदेची ही बैठक महत्त्वाची ठरणार आहे. कारण जम्मू -काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी रणनीती बदलत सामान्य नागरिकांची आणि स्थलांतरितांच्या हत्या सुरू केल्या आहेत. दहशतवाद्यांनी तिथे १३ दिवसांत ११ नागरिकांची हत्या केली आहे. जम्मू -काश्मीरमध्ये होत असलेल्या या हत्यांसह चीन आणि बांगलादेश सीमेवरील परिस्थितीवरही चर्चा होणार असल्याचे समजते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -