Sunday, April 28, 2024
Homeताज्या घडामोडीAjit Pawar : अजित पवारांची इच्छा पण शरद पवार म्हणाले, 'हा...

Ajit Pawar : अजित पवारांची इच्छा पण शरद पवार म्हणाले, ‘हा निर्णय एकट्याचा नाही, त्यासाठी…’

पक्ष संघटनेत अजितदादांना जबाबदारी मिळणार की डावलणार?

बारामती : गेल्या अनेक दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांतर्गत (Nationalist Congress Party) चालू असलेल्या घडामोडींमुळे राष्ट्रवादीत सर्वकाही आलबेल आहे का, याविषयीच्या चर्चांना उधाण आले आहे. राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनादिवशी सुप्रिया सुळे (Supriya Sule) आणि प्रफुल्ल पटेल (Prafull Patel) यांना कार्यकारी अध्यक्षपद सोपवण्यात आलं मात्र अजित पवारांना (Ajit Pawar) देश पातळीवर कोणतीही जबाबदारी देण्यात आली नाही, यावरही जोरदार राजकारण रंगलं. त्यात आता काहीच दिवसांपूर्वी अजित पवारांनी विरोधी पक्षनेते पदाऐवजी पक्षांतर्गत महत्त्वाचे पद देण्याची इच्छा व्यक्त केली. यावर आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी बारामती येथील आजच्या पत्रकार परिषदेत आपली भूमिका मांडली.

“हा निर्णय कुणी एकटा घेत नसतो. अजित पवारांसह प्रमुख लोक बसतील आणि त्यासंदर्भातला निर्णय घेतील. आज पक्षसंघटनेच्या कामात सगळ्यांनीच लक्ष द्यावं अशी भावना आहे. तेच मत त्यांनी व्यक्त केलं. त्यापेक्षा वेगळं काही नाही”, असं शरद पवारांनी नमूद केलं.

पुढे बोलताना ते म्हणाले, “पक्षासाठी आणि संघटनेसाठी काम करावं अशी प्रत्येकाची इच्छा असते. त्यामुळं अजित पवारांनी काही वेगळं केलेलं नाही. पक्षासाठी काम करायच्या भावनेनं अजित पवारांनी त्यांची इच्छा व्यक्त केली आहे. ”

अजित पवारांचं काय चाललंय?

दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रवादीच्या सभेत अजित पवारांना देश पातळीवर कोणतीही जबाबदारी देण्यात आली नव्हती. यावर विरोधी पक्षनेत्याची राज्य पातळीवर खूप मोठी जबाबदारी माझ्यावर असल्याचे अजित पवार म्हणाले होते. मात्र मला विरोधी पक्षनेते पदामध्ये काही इंटरेस्ट नव्हता, आता मला संघटनेत कोणतही पद द्या, मी त्या पदाला न्याय देईन, असं वक्तव्य काही दिवसांपूर्वीच अजित पवार यांनी केलं. त्यामुळे पवारांना प्रदेशाध्यक्ष करण्याच्या समर्थकांच्या मागणीने जोर धरल्याने पक्षांतर्गत दबाव गट निर्माण होत असल्याची चिन्हे निर्माण झाली होती. यात आता शरद पवारांनी अजित पवारांसह प्रमुख लोक निर्णय घेतील, असं म्हटल्याने अजित पवार पुढे काय करणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

इच्छा…

विचारचक्र

- Advertisment -