Sunday, April 28, 2024
Homeताज्या घडामोडी4-Day Work: आता या देशातही ४ दिवस काम, ३ दिवस आराम!

4-Day Work: आता या देशातही ४ दिवस काम, ३ दिवस आराम!

मुंबई: आठवड्यात केवळ ४ चार दिवस काम करण्याचा ट्रेंड हळूहळू वाढत चालला आहे. अनेक देशांमध्ये हा ट्रेंड सुरू झाला आहे. यातच आता आणखी एका देशाचे नाव सामील झाले आहे ते म्हणजे जर्मनी. येथील अनेक कंपन्यांमध्ये ४ दिवस काम हा नियम वापरला जात आहे. जर्मनीआधी अनेक देशांमध्ये याचे ट्रायल करण्यात आले आहे.

पगार कपात न करता एक्स्ट्रा ऑफ डे

ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार जर्मनीमध्ये अनेक कंपन्या चार दिवसांच्या वर्किंग डेची संस्कृती जोपासत आहेत. या अंतर्गत कर्मचाऱ्यांना आठवड्यातील ४ दिवस काम करण्यास सांगत आहे. बाकी ३ दिवस कर्मचाऱ्यांना आराम दिला जाणार आहे. मजेची बाब म्हणजे या कर्मचाऱ्यांच्या वेतनात कोणतीही कपात केली जाणार नाही.

ब्रिटनमध्येही करण्यात आलाय हा प्रयोग

रिपोर्टनुसार, आता जर्मनीमध्ये अनेक कंपन्या ४ दिवसांचा वर्किंग वीक टेस्ट करत आहेत. या प्रयोगात साधारण ४५ कंपन्या भाग घेत आहेत. यात भाग घेणाऱ्या कंपन्या कर्मचाऱ्यांच्या वेतनात कोणतेही बदल न करता कर्मचाऱ्यांच्या कामाच्या तासात कपात करत आहे.

कंपन्यांचा हा त्रास होणार दूर

जर्मनी आर्थिक मोर्चावर संघर्ष करत आहे. युरोपातील सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था गेल्या वर्षी आर्थिक मंदीच्या लाटेमध्ये घसरली होती. त्यानंतर आता जर्मनी पुन्हा आर्थिक मार्गावर परतण्यासाठी संघर्ष करत आहे. प्रतिकूल परिस्थितीत कंपन्यांना त्रास होत आहे. कंपन्यांसाठी सगळ्यात मोठी समस्या म्हणजे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची कमतरता. अशातच मानले जात आहे. ४ दिवसांचा वीक डेमुळे केवळ कर्मचाऱ्यांची उत्पादकताच वाढणार नाही तर सोबतच त्यांच्या समोर उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांच्या कमतरतेचे संकटही दूर होईल.

१ फेब्रुवारीपासून बदलाची अंमलबजावणी

अनेक लेबर युनियम आणि राईट्स असोसिएशन कामगारांवरील दबाव कमी कऱण्याची मागणी करत आहे. जर्मनीमध्येही लेबर युनियनकडून अशा प्रकारच्या मागण्या केल्या जात आहे. ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार, प्रयोगात सामील कंपन्या १ फेब्रुवारीपासून केल्या जाणाऱ्या बदलाची अंमलबजावणी करणार आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -