Wednesday, June 26, 2024
Homeताज्या घडामोडीमायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला यांच्या २६ वर्षीय मुलाचे निधन

मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला यांच्या २६ वर्षीय मुलाचे निधन

नवी दिल्ली : मायक्रोसॉफ्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्या नडेला आणि त्यांची पत्नी अनु यांचा मुलगा झैन नडेला याचे सोमवारी सकाळी निधन झाले. तो २६ वर्षांचा होता. तो जन्मजात सेरेब्रल पाल्सीने ग्रस्त होता. याविषयी मायक्रोसॉफ्ट कॉर्पोरेशनने माहिती दिली. नडेला यांनी स्वत: कंपनीच्या कार्यकारी अधिकाऱ्यांना इमेल करत झेनचे निधन झाल्याची माहिती दिली.

२०१४ मध्ये कंपनीचे सीईओचे पद स्विकारल्यानंतर नडेला यांनी अपंगांना अधिक चांगली सेवा देण्यासाठी उत्पादने डिझाइन करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. सिएटल चिल्ड्रन्स सेंटर फॉर इंटिग्रेटिव्ह ब्रेन रिसर्च येथे झेन उपचार घेत होता या रूग्णालयातील पेडियाट्रिक न्यूरोसायन्स विभागात इतर मुलांना चांगले उपचार मिळावेत यासाठी नडेलांनी झेन नडेला एंडॉव्ड चेअरची स्थापना केली.

सत्या यांनी ऑक्टोबर २०१७ च्या ब्लॉग पोस्टमध्ये मुलाच्या या आजारासंदर्भात भाष्य केलं होतं.

“अनु गरोदर असताना ३६ व्या आठवड्यामध्ये अचानक एका रात्री तिला गर्भामध्ये बाळ हलचाल करत नसल्याचं लक्षात आलं. याबद्दल तिला आश्चर्य वाटलं. आम्ही त्यावेळी बेलीव्हू येथील स्थानिक रुग्णालयाच्या आपत्कालीन सेवा मिळणाऱ्या केंद्रात धाव घेतली. हे एखादं रुटीन चेकअप असेल असं वाटलेलं. नवीन पालक म्हणून आम्हाला थोडं बैचन व्हायलाही होत होतं. खरं तर मला आपत्कालीन सेवेसाठी लागणारा वेळ आणि पहावी लागणारी वाट यामुळे फार अस्वस्थ व्हायला झालेलं. मात्र तपासणीनंतर डॉक्टरांनी तातडीने सीझेरियन पद्धतीने प्रसुती करण्याचा निर्णय घेतला. झैनचा जन्म १३ ऑगस्ट १९९६ रोजी ११ वाजून २९ मिनिटांनी झाला. तो जन्माला आल्यानंतर रडला नाही,” असं सत्या यांनी ब्लॉगमध्ये लिहिलेलं.

“झैनला नंतर त्या रुग्णालयामधून लेक वॉशिंग्टन आणि नंतर सिएटलमधील मुलांच्या रुग्णालयामध्ये हलवण्यात आलं. त्याला आयसीयूमध्ये ठेवण्यात आलं होतं. दुसरीकडे अनु प्रसुतीनंतर रिकव्हर होतं होती. मी रात्रभर तिच्यासोबत असायचो आणि नंतर दुसऱ्या दिवशी झैनला भेटण्यासाठी जायचो. आमचं आयुष्य कायमचं बदलून जाईल याची मला पुसटशीही कल्पना नव्हती. पुढील काही वर्षांमध्ये आम्हाला गर्भशयामध्ये श्वास अडकल्याने बाळाला झालेल्या त्रासासंदर्भात अधिक माहिती मिळाली. त्यानंतर झैनला व्हिलचेअरची गरज भासणार याची आम्हाला जाणीव झाली. तो नंतर ‘सेरेब्रल पाल्सी’मुळे कायम आमच्यावर निर्भर असणारं हे सुद्धा जाणवलं. यामुळे मी पूर्णपणे निराश झालेलो. मात्र अनु आणि माझ्यासोबत जे झालं त्यामुळे मी फार निराश झालेलो हे नंतर जाणवलं,” असं नाडेला ब्लॉगमध्ये म्हणाले होते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -