मुंबई : महाराष्ट्रात रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा शिकणे बंधनकारक करण्यात आले असले, तरी विविध वयोगटातील चालकांना इतक्या अल्प कालावधीत भाषा आत्मसात करणे कठीण जात असल्याचा मुद्दा समोर आला होता. या पार्श्वभूमीवर, चालकांच्या विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी केलेल्या मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करत राज्य सरकारने रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी एक वर्षाची मुदतवाढ देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. सह्याद्री अतिथीगृहावर आयोजित पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही घोषणा केली.
पिंपरी-चिंचवड : वाकड परिसरात ३२ वर्षीय विवाहितेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शिल्पा सचिन गवारे असे मृत विवाहितेचे नाव आहे. ...
विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी हाजी आराफात यांच्या माध्यमातून आपली भेट घेतल्याचे सांगत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्रात मराठी असो किंवा अन्य भाषिक, प्रत्येकाने मराठी शिकलेच पाहिजे या भूमिकेला आमचा पूर्ण पाठिंबा आहे. यापूर्वीही चालकांनी यासाठी केलेले प्रयत्न कौतुकास्पद असून भविष्यातही हे प्रयत्न असेच सुरू राहणार आहेत. मात्र, वेगवेगळ्या वयोगटातील चालकांना अवघ्या काही दिवसांत किंवा कमी कालावधीत मराठी शिकणे व्यावहारिकदृष्ट्या शक्य नसल्याने त्यांना आणखी काही कालावधी देण्याची विनंती संघटनांनी केली होती.
मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) औषध निरीक्षक पदाच्या पेपरफुटी प्रकरणावरून भाजपने राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे आमदार रोहित पवार ...
या मागणीची दखल घेत सरकारने चालकांना एक वर्षाची मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला असून, या मुदतीत त्यांच्यावर कोणतीही दंडात्मक वा कायदेशीर कारवाई केली जाणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे. या कालावधीत विविध माध्यमातून विशेष वर्ग सुरू केले जातील तसेच आवश्यक शैक्षणिक साहित्य तयार करून ऑटो रिक्षा आणि टॅक्सीचालकांना सुलभ पद्धतीने मराठी भाषा शिकवली जाईल. जे चालक स्वतःहून पुढे येऊन मराठी शिकण्याची तयारी दर्शवत आहेत, त्यांना प्रशासनाकडून आवश्यक तो वेळ आणि सहकार्य देणे गरजेचे असल्यानेच हा निर्णय घेण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.






