Thursday, August 27, 2026

Mumbai Garbage-Free : पुढील चार वर्षांत मुंबई कचरापेट्या मुक्त?

Mumbai Garbage-Free : पुढील चार वर्षांत मुंबई कचरापेट्या मुक्त?

- सार्वजनिक कचरा पेट्या हटवून घरोघरी कचरा उचलण्यावर दिला जाणार भर

मुंबई (विशेष प्रतिनिधी)

मुंबईतील कचरा उचलण्यासाठी आता नव्याने नियुक्त केलेल्या कंत्राटदारामार्फत आता कचरा उचलण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. या कंपन्यांमार्फत आता वाहनांसह मनुष्यबळही उपलब्ध करून दिले जात आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये मुंबईतील सार्वजनिक कचरा पेट्या रस्त्यावरुन कायमचाच हद्दपार होणार आहे. मुंबईकरांचा कचरा घरोघरी आणि सोसायट्यांमध्येच उचलला जाणार असून त्यांना आता सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकण्याची आवश्यकता भासणार नाही. त्यामुळे मुंबईत पुढील पाच वर्षांमध्ये टप्प्याटप्प्याने सार्वजनिक कचरा पेट्या गायब होवून कचरापेट्या मुक्त मुंबईचे चित्र दिसणार आहे. (Mumbai Garbage-Free)

मुंबई महापालिकेच्यावतीने कचरा उचलण्याच्या कामांचे खासगीकरण करून वाहनांसह मनुष्यबळाची सेवा उपलब्ध करून घेत कचरा उचलणे आणि वाहून नेण्याच्या कामासाठी खासगी कंपन्यांची निवड केली आहे. महापालिकेने २३ विभागीय कार्यालयांमधील कचरा उचलण्यासाठी आठ गटांमध्ये विभागून कंत्राटदारांची नेमणूक करण्यात आली आहे. यासर्व नियुक्त कंत्राटदारांची सेवा येत्या सप्टेंबर महिन्यापासून पूर्णपणे महापालिकेला उपलब्ध होणार आहे, तर गट क्रमांक दोनमधील ई, एफ दक्षिण व एफ उत्तर विभागासाठीच्या कंत्राट कामाला मागील महिन्यात मंजुरी देण्यात आल्याने या विभागीय कार्यालयांमध्ये सर्वांत शेवटी वाहनांसह मनुष्यबळाची सुविधा उपलब्ध होणार आहे. तर पूर्व उपनगरातील एल, एम पूर्व आणि एम पश्चिम विभागाकरता महापालिकेची वाहने आणि कामगार असतील. (Mumbai Garbage-Free)

या कचरा कंत्राटदारांमार्फतच आता रहिवाशी सोसायटी आदींना कचरा पेट्या उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. महापालिका घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार सध्या मुंबईत १८०० सार्वजनिक कचरा पेट्या आहेत. तसेच २२ हजार पेक्षा जास्त घरोघरी कचरा संकलन केंद्र आहेत. एक सार्वजनिक कचरा संकलन केंद्र बंद केल्यानंतर सुमारे १० ते १५ घरोघरी होणारा कचरा संकलन केंद्र निर्माण होतात. त्यामुळे कंत्राटदाराला सर्व उघड्यावरील कचरा टाकण्याच्या जागा आणि सर्व सार्वजनिक कचरा संकलन केंद्र यांचे निर्मुलन करायचे आहे. त्यामुळे या सार्वजनिक कचरा पेट्या या पुढील चार वर्षांत बंद करून घरोघरी कचरा गोळा करण्यावर भर दिला जाणार आहे. त्यामुळे घरोघरी कचरा संकलनाचे प्रमाण वाढवून सार्वजनिक कचरा पेट्या या पुढील चार वर्षांत रस्त्यावरुन कायमच्या हद्दपार केल्या जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. (Mumbai Garbage-Free)

तसेच मुंबईत मोठ्याप्रमाणात कचरा निर्माण करणारी केंद्रे वाढत असून भविष्य काळात जर शासनाने या केंद्रातील कचरा घेण्यास महापालिकेला मनाई केली तर भविष्यात अंदाजित केलेल्या कचऱ्याच्या प्रमाणात मोठ्याप्रमाणात घट होणार आहे, असेही स्प्ष्ट केले आहे. (Mumbai Garbage-Free)

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा