मुंबई : मुख्यमंत्री मत्स्य संपदा योजनेअंतर्गत मत्स्यबाजार (फिश मार्केट) स्थापनेसाठी लोकप्रतिनिधींकडून प्राप्त प्रस्तावांची वर्गवारी करून कामे टप्प्याटप्प्याने आणि गतीने पूर्ण करण्याच्या सूचना मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिल्या. मत्स्यबाजाराबाबत लोकप्रतिनिधींकडून प्राप्त प्रकरणे, त्यावर करण्यात आलेली कार्यवाही, तसेच मुख्यमंत्री मत्स्य संपदा योजनेअंतर्गत मत्स्यबाजार स्थापनेसाठी वर्गवारीनिहाय निश्चित करण्यात आलेले लक्ष्यांक आणि त्यानुषंगाने कार्यवाहीत होणारा विलंब याबाबत मंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील त्यांच्या दालनात आढावा बैठक झाली.
मुंबई : मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेची प्रभावी आणि गतिमान अंमलबजावणी करून अधिकाधिक पात्र लाभार्थ्यांना योजनेचा लाभ मिळवून द्यावा, असे निर्देश ...
बैठकीत मंत्री राणे यांनी प्राप्त झालेल्या सर्व प्रस्तावांचा सविस्तर आढावा घेतला. लोकप्रतिनिधींकडून प्राप्त प्रस्तावांची योग्य वर्गवारी करून फेजनिहाय कामे हाती घेण्यात यावीत आणि ती निर्धारित कालावधीत गतीने पूर्ण करण्यात यावीत, अशा सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील नशिराबाद (Nashirabad) येथे हृदयद्रावक घटना समोर आली आहे. घरातील झोपाळ्यावर खेळताना झोक्याच्या दोरीचा फास लागून दीड वर्षांच्या ...
प्राप्त झालेल्या सर्व प्रस्तावांची एकत्रित यादी तयार करून प्रत्येक कामाचा सविस्तर आराखडा तयार करावा. कामांना आवश्यकतेनुसार टप्पे निश्चित करून त्या-त्या टप्प्यानुसार कामे पूर्ण करावीत. सर्व प्रस्तावांचा एकत्रित विचार करून नियोजनबद्ध पद्धतीने कामांची आखणी करण्यात यावी, असेही मंत्री राणे यांनी सांगितले. बैठकीस मत्स्यव्यवसाय आयुक्त प्रेरणा देशभ्रतार तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.





