Tuesday, August 25, 2026

Raksha Bandhan Controversy : 'बिकिनी घालून राखी बांधणार का?' रक्षाबंधनच्या जाहिरातीवर कंगना रणौत संतापली; कृति सॅनॉनला सुनावलं

Raksha Bandhan Controversy : 'बिकिनी घालून राखी बांधणार का?' रक्षाबंधनच्या जाहिरातीवर कंगना रणौत संतापली; कृति सॅनॉनला सुनावलं

कंगना रणौतने रक्षाबंधनच्या जाहिरातीतील पोशाखावरून अभिनेत्री कृती सॅनॉनवर निशाणा साधला. ‘जीवा’च्या जाहिरातीत कृतीच्या ऑफ-व्हाइट लूकवर सोशल मीडियावर टीका होत असताना, कंगनाने महिलांना कपड्यांच्या बाबतीत काही मर्यादा पाळण्याचा सल्ला दिला. ( Kangana Ranaut)

कंगनाने आपल्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये महिलांना आपल्या आवडीनुसार कपडे परिधान करण्याचे स्वातंत्र्य असल्याचे म्हटले. मात्र, पारंपरिक सणांच्या संदर्भात कपड्यांची निवड करताना काही मर्यादा असाव्यात, असे तिने सुचवले. ( Kangana Ranaut)

अभिनेत्री कंगना स्पष्टचं बोलली

कंगनाने पोस्टमध्ये म्हटले की, आजच्या महिलांकडे कॉकटेल ड्रेसपासून लेहेंगा-चोली, जीन्स, साडी, बिकिनी आणि सलवार-कमीजपर्यंत कपड्यांचे अनेक पर्याय आहेत. त्यामुळे भावाला राखी बांधताना बिकिनी किंवा अंतर्वस्त्रांसारखा पोशाख का निवडला जावा, असा सवाल तिने केला. तिच्या मते, ही जाहिरात जाणीवपूर्वक विचित्र पद्धतीने तयार करण्यात आली आहे.  ( Kangana Statement)

दरम्यान, कृतीच्या जाहिरातीवर सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. काही युजर्सनी जाहिरातीतील पोशाखावर टीका केली, तर काहींनी कपड्यांच्या निवडीवरून अभिनेत्रीला ट्रोल करणे योग्य नसल्याचे म्हटले आहे. ( Raksha Bandhan Ad)

या संपूर्ण वादावर कृती सॅनॉनकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही. ( Raksha Bandhan Advertisement)

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >