मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागामार्फत अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांसाठी देशी बैलजोडी खरेदीसाठी अनुदान योजना राबवली जाते. या योजनेंतर्गत पात्र शेतकऱ्यांना बैलजोडी खरेदीसाठी ५० टक्के ते ७५ टक्क्यांपर्यंत अनुदान मिळू शकते. (Maharshtra Farmers)
Raksha Bandhan Controversy : 'बिकिनी घालून राखी बांधणार का?' रक्षाबंधनच्या जाहिरातीवर कंगना रणौत संतापली; कृति सॅनॉनला सुनावलं
कंगना रणौतने रक्षाबंधनच्या जाहिरातीतील पोशाखावरून अभिनेत्री कृती सॅनॉनवर निशाणा साधला. ‘जीवा’च्या जाहिरातीत कृतीच्या ऑफ-व्हाइट लूकवर सोशल ...
कोणाला किती अनुदान?
अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती प्रवर्गातील पात्र शेतकऱ्यांना बैलजोडी खरेदीसाठी कमाल १ लाख २६ हजार रुपयांपर्यंत म्हणजेच ७५ टक्के अनुदान मिळू शकते. ( Bullock Pair Subsidy)
तर सर्वसाधारण प्रवर्गातील शेतकऱ्यांना कमाल ८४ हजार ७५ रुपयांपर्यंत म्हणजेच ५० टक्के अनुदान दिले जाते. (Government Scheme For Farmers)
कोणते शेतकरी पात्र?
या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी अल्प किंवा अत्यल्प भूधारक असणे आवश्यक आहे.
शेतजमीन संबंधित शेतकऱ्याच्या नावावर असून त्याचा ७/१२ उतारा असणे आवश्यक आहे. वनहक्क जमीनधारक शेतकऱ्यांसाठी संबंधित नियमांनुसार आवश्यक कागदपत्रे सादर करावी लागतील. ( Farmer Welfare)
असा करा ऑनलाइन अर्ज
योजनेसाठी अर्ज करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत
MahaDBT Portal वर जावे. पोर्टलवर नोंदणी करून किंवा आधीच खाते असल्यास लॉगिन करून पशुसंवर्धन विभागातील ‘बैलजोडी खरेदी योजना’ निवडावी. त्यानंतर आवश्यक माहिती आणि कागदपत्रे सादर करून अर्ज करता येईल.