मुंबई : मराठी चित्रपट आणि मालिकांमधून प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचलेली अभिनेत्री तेजस्विनी लोणारी हिने चाहत्यांना गोड बातमी दिली आहे. तेजस्विनी आणि तिचे पती, शिवसेना युवा नेते समाधान सरवणकर (Samadhan Sarvankar) यांच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचे आगमन झाले आहे. तेजस्विनीने एका गोंडस मुलाला जन्म दिला असून, या आनंदाच्या बातमीने लोणारी आणि सरवणकर कुटुंबात उत्साहाचे वातावरण आहे.
आजकाल ऑनलाइन जेवण मागवणे जितके सोपे झाले आहे, तितकेच त्यात फसवणुकीचे प्रकारही वाढले आहेत. उत्तराखंडमधून एक असाच धक्कादायक प्रकार समोर आला आहे, जिथे ...
‘छोटा राजकुमार’ घरी आला!
“धरायला एक छोटासा हात, प्रेम करायला एक लहानसं हृदय आणि आयुष्यभराच्या सुंदर आठवणी बनवण्यासाठी आमच्या घराला सर्वात मौल्यवान भेट मिळाली आहे. या जगात तुझे स्वागत आहे, आमच्या छोट्या राजकुमारा,” अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. ही बातमी समोर आल्यानंतर सोशल मीडियावर तेजस्विनी आणि समाधान (Samadhan Sarvankar) यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. मनोरंजन आणि राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवरांसह चाहत्यांनी या दाम्पत्याला शुभेच्छा दिल्या आहेत.
मुंबई : महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळात चर्चेत राहिलेल्या भोंदू कॅप्टन अशोक खरात प्रकरणावर आधारित 'महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स' या मराठी ...
डिसेंबरमध्ये थाटामाटात झाला होता विवाह :
‘बिग बॉस मराठी’ फेम तेजस्विनी लोणारी आणि समाधान सरवणकर (Samadhan Sarvankar) यांचा डिसेंबर महिन्यात विवाहसोहळा पार पडला होता. लग्नानंतर आता त्यांच्या आयुष्यात एका नव्या आणि सुंदर पर्वाची सुरुवात झाली आहे.
अभिनयातून प्रेक्षकांच्या मनात खास स्थान :
तेजस्विनी लोणारी हिने मराठी मनोरंजन विश्वात आपल्या अभिनयाने वेगळी ओळख निर्माण केली आहे. विविध मालिका आणि चित्रपटांमधील भूमिकांसोबतच ‘बिग बॉस मराठी’मधील तिच्या सहभागामुळे ती घराघरात पोहोचली. तिच्या अभिनयाला आणि व्यक्तिमत्त्वाला प्रेक्षकांकडून मोठी पसंती मिळाली. दुसरीकडे, समाधान सरवणकर हे राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात सक्रिय आहेत. आता या दाम्पत्याच्या आयुष्यात छोट्या राजकुमाराचे आगमन झाल्याने दोन्ही कुटुंबांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. (Samadhan Sarvankar)





