Monday, August 24, 2026

Maharashtra Weather Alert : राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढणार; ‘या’ ११ जिल्ह्यांना यलो अलर्ट, कुठे बरसणार मुसळधार?

Maharashtra Weather Alert : राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढणार; ‘या’ ११ जिल्ह्यांना यलो अलर्ट, कुठे बरसणार मुसळधार?

मुंबई : ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासून राज्यातील पावसाचा जोर काहीसा कमी झाला होता. अनेक भागांत पावसाने उघडीप घेतल्याचं चित्र पाहायला मिळत होतं. मात्र, आता पुन्हा एकदा पावसाने जोर धरला असून कोकण, घाटमाथा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील काही भागांत पावसाने हजेरी लावली आहे. २५ ऑगस्ट रोजीही राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये जोरदार, तर काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने पुढील २४ तासांसाठी ११ जिल्ह्यांना यलो अलर्ट दिला आहे. (Maharashtra Weather Alert)

कोकणात पावसाची विश्रांती कायम :

कोकण विभागात सध्या पावसाचा जोर काहीसा कमी असल्याचं चित्र आहे. या भागासाठी कोणताही विशेष हवामान अलर्ट जारी करण्यात आलेला नाही. मात्र, काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुढील चार ते पाच दिवस हवामान ढगाळ, कोरडं आणि दमट राहण्याचा अंदाज आहे. (Maharashtra Weather Alert)

उत्तर महाराष्ट्रात हलक्या सरींची शक्यता :

धुळे, नंदुरबार, जळगाव आणि नाशिक जिल्ह्यांना सध्या कोणताही विशेष अलर्ट देण्यात आलेला नाही. मात्र, काही ठिकाणी हलक्या पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. पुढील काही दिवस या भागात हवामानात मोठा बदल अपेक्षित नसून, जोरदार पावसाची शक्यता कमी आहे. (Maharashtra Weather Alert)

घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा अंदाज :

पश्चिम महाराष्ट्रातील घाटमाथा परिसरात पुन्हा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. पुणे, सातारा आणि कोल्हापूरच्या घाटमाथा भागाला यलो अलर्ट देण्यात आला आहे. या भागात जोरदार ते मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांत काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस, तसेच वादळी पावसाची शक्यता आहे. (Maharashtra Weather Alert)

मराठवाड्यात ‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट :

मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम वादळी पाऊस पडू शकतो. काही भागांत ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचा अंदाजही आहे. (Maharashtra Weather Alert)

विदर्भातही पावसाचा जोर वाढणार :

विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया आणि नागपूर या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. या भागात हलका ते मध्यम, तर काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यांत सध्या कोणताही विशेष अलर्ट नाही. मात्र, पुढील एक ते दोन दिवसांत काही ठिकाणी पावसाच्या सरी पडण्याची शक्यता आहे. (Maharashtra Weather Alert)

शेतकऱ्यांना दिलासा मिळणार?

एकूणच राज्यातील हवामानात पुन्हा बदल होत असून पावसासाठी पोषक वातावरण तयार झालं आहे. मराठवाडा, विदर्भ आणि घाटमाथा परिसरात पावसाची शक्यता वाढली असून इतर भागांतही हलक्या सरींची शक्यता आहे. त्यामुळे पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकरी आणि नागरिकांना काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. (Maharashtra Weather Alert)

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >