मुंबई : मुंबईतील विलेपार्ले परिसरात द्रोणाचार्य पुरस्काराने सन्मानित 48 वर्षीय जिम्नॅस्टिक्स प्रशिक्षकाविरोधात 16 वर्षीय विद्यार्थिनीच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. विद्यार्थिनीने व्यायामशाळेत प्रशिक्षकाने लैंगिक छळ केल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणी विलेपार्ले पोलिसांनी POCSO कायदा आणि भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमांनुसार FIR नोंदवला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित विद्यार्थिनी गेल्या काही वर्षांपासून या प्रशिक्षकाकडून जिम्नॅस्टिक्सचे प्रशिक्षण घेत होती. शुक्रवारी सकाळी प्रशिक्षकाने तिला व्हॉट्सॲपवर 'हाय' असा संदेश पाठवला. त्यानंतर तिने त्याच्याशी संपर्क साधला असता, प्रशिक्षकाने तिला जिममध्ये भेटण्यास सांगितल्याचे तक्रारीत नमूद आहे.
मुंबई: मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुलातील (BKC) टेन बीकेसी कॉम्प्लेक्समध्ये एसी युनिट बसवताना 11व्या मजल्यावरून पडून 27 वर्षीय एअर-कंडिशनर तंत्रज्ञाचा ...
एकटीला बोलावून घेतलं अन्...
जिम्नॅस्टिक्सशी संबंधित चर्चा असेल, असे समजून विद्यार्थिनी व्यायामशाळेत गेली. त्यावेळी प्रशिक्षक तेथे एकटेच होते. तक्रारीनुसार, त्यांनी तिला आत येण्यास आणि दरवाजा बंद करण्यास सांगितले. त्यानंतर कॉलेज आणि अभ्यासाबाबत चर्चा सुरू असताना प्रशिक्षकाने तिच्याशी गैरवर्तन केल्याचा आरोप विद्यार्थिनीने केला आहे.
घटनेनंतर विद्यार्थिनी थेट महाविद्यालयात गेली. तिची अस्वस्थ अवस्था पाहून मैत्रिणींनी विचारणा केली असता तिने कथित प्रकाराची माहिती दिली. त्यानंतर ही बाब शिक्षिकेला आणि पुढे कुटुंबीयांना समजली. कुटुंबीयांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली.
दरम्यान, पोलिसांनी व्यायामशाळा आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली आहे. तसेच विद्यार्थिनी आणि प्रशिक्षक यांच्यातील व्हॉट्सॲप संभाषणाचीही चौकशी केली जात आहे. आरोपी प्रशिक्षकाची चौकशी सुरू असून, तपासातून समोर येणाऱ्या तथ्यांच्या आधारे पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.





