Nashik Crime News : नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यात धक्कादायक घटना समोर आली आहे. मजुरीचे पैसे दिले नाहीत या रागातून एका २९ वर्षीय तरुणाच्या डोक्यात धारदार हत्याराने वार करून त्याचा खून करण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे. ही घटना दिंडोरी तालुक्यातील गोळशी येथे घडली असून योगेश रघुनाथ लहांगे (Yogesh Raghunath Lahange) (वय २९, रा. गोळशी) असे मृत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी दिंडोरी पोलीस ठाण्यात (Dindori Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत या प्रकरणात दोन संशयित आरोपींना अटक केली आहे. (Nashik Crime News)
Nashik Crime News : कंपनीच्या कामानिमित्त मित्रासोबत वाडीवऱ्हे परिसरात (Wadivarhe area) गेलेल्या सिडकोतील ३४ वर्षीय महिलेचा अपघातात मृत्यू झाला होता. मंगळवारी दुपारी दोन ...
नेमकं काय घडलं ?
फिर्यादी अशोक रघुनाथ लहांगे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, हा संपूर्ण घटनाक्रम १७ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजता घडला. मजुरीच्या पैशांच्या देण्याघेण्यावरून हा वाद निर्माण झाला, यावरून संशयित आरोपी अशोक म्हसु गायकवाड (वय ४२, रा. गोळशी) आणि किशोर हरी गांगोडे (वय ४४, रा. फोपळवाडे) यांनी संगणमत करून योगेशच्या डोक्यात धारदार हत्याराने तीन जबर वार केले. धक्कादायक म्हणजे घटनेनंतर आरोपी किशोर याने योगेश दारू पिऊन पडल्याचा बनाव रचला. मात्र, कुटुंबीयांनी घटनास्थळी धाव घेतली असता योगेश गंभीर जखमी अवस्थेत आढळला. त्यास तातडीने उमराळे आरोग्य केंद्रात आणि नंतर आडगाव मेडिकल कॉलेज (Adgaon Medical College) येथे दाखल करण्यात आले. परंतु उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. (Nashik Crime News)
Nashik : हरिहर गड (Harihar Fort) हा नाशिक जिल्ह्यातील एक अत्यंत प्रसिद्ध आणि थरारक गिरिदुर्ग आहे. हा किल्ला त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwar) रांगेत असून, खडकात कोरलेल्या ...
दोन संशयितांना अटक
पोलिसांनी घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने कारवाई करत दोन्ही आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. पोलीस निरीक्षक भगवान मथुरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक राखोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रल्हाद पवार, अल्ताफ शेख, हरिश्चंद्र पाडवी, प्रदीप शिंदे व पथक या गुन्ह्याचा पुढील तपास करत आहेत,






