Jalgaon Crime : शेतजमिनीच्या सातबारा उताऱ्यावरील इतर अधिकारातील कालबाह्य नोंदी कमी करण्याच्या कामासाठी ८५ हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी पाचोरा तहसील कार्यालयातील (Pachora Tehsil Office) स्टॅम्प वेंडरविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये (Anti-Corruption Act) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Dhule Anti-Corruption Bureau) ही कारवाई केली. समाधान सुभाष पाटील (४०, रा. कुऱ्हाड बु., ता. पाचोरा) असे संशयिताचे नाव असून, गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याला अटक करण्यात आली. ( Jalgaon Crime News )
Jalgaon : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या (महावितरण) जळगाव मंडळातील वीज वितरण व्यवस्थेतील ढिसाळ कारभाराचा ठपका ठेवत अधीक्षक अभियंता विनोद चंद्रकांत ...
नेमकं प्रकरण काय ?
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti-Corruption Bureau) दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदाराच्या कुटुंबाच्या मालकीच्या मौजे कुऱ्हाड बु. (ता. पाचोरा) येथील शेतजमिनीच्या ७/१२ उताऱ्यावर इतर अधिकारात कालबाह्य नोंदी कमी करण्याचे काम होते. या कामासाठी तक्रारदाराने संबंधित तलाठी नकुल काळकर (Talathi Nakul Kalkar) यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी ८० हजार रुपये लाचेची मागणी करुन स्टॅम्प वेंडर समाधान पाटील (Stamp Vendor Samadhan Patil) यास पैसे दिल्यावर तुमचे काम होईल, असे सांगितल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. मात्र, लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने या मागणीबाबत धुळे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (Anti-Corruption Bureau) लेखी तक्रार केली. त्यानंतर ७ ऑगस्ट रोजी पंचांसमक्ष लाचेच्या मागणीची पडताळणी करण्यात आली. यावेळी समाधान पाटील याने ९० हजार रुपयांची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. तडजोडीनंतर ८५ हजार रुपये स्वीकारण्याचे त्याने मान्य केल्याचे एसीबीने सांगितले. ( Jalgaon Crime News )
Jalgaon Crime : जळगाव तालुक्यातील नशिराबाद येथे एक खळबळजनक घटना घडली आहे. एका पोलीस कर्मचाऱ्याच्या घरावरच दोन अज्ञात दरोडेखोरांनी सशस्त्र दरोडा टाकल्याची ...
स्टॅम्प वेंडरविरुद्ध गुन्हा दाखल
९ ऑगस्ट रोजी झालेल्या दुसऱ्या पडताळणीदरम्यान तक्रारदाराने तलाठी नकुल काळकर यांच्याशी संपर्क साधला. स्टॅम्प वेंडरने लाचेची (Stamp Vendor Samadhan Patil) मागणी केल्याची माहिती देऊनही त्यांनी तक्रारदाराला रक्कम देण्यास मनाई केली नसल्याचे तपासात समोर आले. तसेच, या प्रकरणाशी आपला संबंध नसून काम तहसीलदारांच्या हातात असल्याचे त्यांनी सांगितल्याचे एसीबीने नमूद केले. दरम्यान, तक्रारदाराने एसीबीकडे तक्रार केल्याची माहिती मिळाल्यानंतर समाधान पाटील तक्रारदाराच्या घरी गेला. पैसे देण्याची गरज नसून तलाठी काळकर यांच्याकडून काम करून देतो, असे त्याने सांगितले. मात्र, लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाल्याने २० ऑगस्ट रोजी पाचोरा पोलिस ठाण्यात (Pachora Police Station) त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई पोलीस उपअधीक्षक सचिन साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक पद्मावती कलाल यांच्या पथकाने केली.






