Friday, August 21, 2026

Hindalga Jail : 40 हजारांची लाच अन् कैद्याला अर्धनग्न कॉल; महिला पोलिसाचे भयानक कांड

Hindalga Jail : 40 हजारांची लाच अन् कैद्याला अर्धनग्न कॉल; महिला पोलिसाचे भयानक कांड

बेळगाव : कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यातील हिंडलगा कारागृह पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. तुरुंगातील एका महिला पोलीस अधिकाऱ्याने कैद्याकडून 40 हजार रुपयांची लाच घेतल्याचा आणि त्यानंतर खाकी वर्दीत असतानाच अर्धनग्न अवस्थेत व्हिडिओ कॉल केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेचा कथित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर प्रकरणाला गंभीर वळण मिळाले आहे. या प्रकरणी लोकायुक्तांकडे तक्रार करण्यात आली असून चौकशीची मागणी करण्यात आली आहे. (Hindalga Jail)

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित महिला अधिकारी सुमारे दोन वर्षांपूर्वी हिंडलगा कारागृहात कार्यरत होती. त्यावेळी कैद्यांकडून पैसे घेऊन त्यांना घरचे जेवण पुरवले जात असल्याचा आरोप आहे. एका कैद्याकडून 40 हजार रुपये घेतल्यानंतर त्याला व्हिडिओ कॉल करण्यात आल्याचा दावाही तक्रारीत करण्यात आला आहे. या कॉलदरम्यान महिला अधिकारी वर्दीतून अर्धनग्न अवस्थेत दिसत असल्याचा दावा करण्यात आला आहे. हा कथित व्हिडिओ दोन वर्षांपूर्वीचा असल्याचे सांगितले जात असून तो आता सोशल मीडियावर समोर आला आहे. (Jail Corruption)

तक्रार थेट लोकायुक्तांकडे

सुरेश उर्फ साईकुमार या माजी कैद्याने लोकायुक्तांकडे तक्रार केल्याची माहिती आहे. त्याने कारागृहातील गैरप्रकारांबाबत अनेक गंभीर आरोप केले आहेत. तुरुंगात बेकायदेशीरपणे दारू, गांजा, मोबाईल आणि सिमकार्ड उपलब्ध करून दिले जात असल्याचा दावा त्याने केला आहे. काही अधिकाऱ्यांकडूनच कैद्यांना या वस्तू पुरवल्या जात असल्याचा आरोपही त्याने केला आहे.

तुरुंगात मोबाईल नेण्यास कडक बंदी असतानाही कैद्यांकडे मोबाईल कसे पोहोचतात, यावरही त्याने प्रश्न उपस्थित केला आहे. काही प्रकरणांमध्ये कैद्यांना अडकवण्यासाठी त्यांच्या जवळ मोबाईल सापडल्याचे दाखवून कारवाई केली जाते, असा आरोपही तक्रारीत करण्यात आला आहे. ( Police Officer)

 

जेलमध्ये सुरु आहे अनैतिक प्रकार

याशिवाय कारागृहात अनैतिक प्रकार सुरू असल्याचे गंभीर आरोपही करण्यात आले आहेत. मात्र, या सर्व आरोपांची स्वतंत्रपणे पुष्टी झालेली नाही. संबंधित महिला अधिकारी किंवा कारागृह प्रशासनाची बाजूही अद्याप स्पष्ट झालेली नाही.

व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर कर्नाटक सरकारने या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिल्याची माहिती आहे. त्यामुळे हिंडलगा कारागृहातील कथित गैरप्रकारांची चौकशी झाल्यानंतरच या आरोपांमधील सत्य समोर येणार आहे. ( Bribe Case)

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >