Nashik Crime News : वाडीवऱ्हे पोलिसांकडून 'त्या' घटनेचा अखेर शोध, महिलेच्या मित्रानेच...

Nashik Crime News : कंपनीच्या कामानिमित्त मित्रासोबत वाडीवऱ्हे परिसरात (Wadivarhe area) गेलेल्या सिडकोतील ३४ वर्षीय महिलेचा अपघातात मृत्यू झाला होता. मंगळवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास संबंधित महिला मित्रासोबत एका रिसॉर्टमध्ये (Resort) जेवण केल्यानंतर बाहेर पडत होती मात्र तिच्या मित्राचे कारवरील नियंत्रण सुटल्याने कार प्रवेशद्वाराला धडकली, आणि यामध्ये महिलेला गंभीर दुखापत झाली. त्यानंतर काही वेळातच तिचा मृत्यू झाला होता. हा अपघात की घातपात याबाबत शंका उपस्थित होत असतानाच वाडीवऱ्हे पोलिसांनी (Wadivarhe Police) या घटनेचा छडा लावला आहे. (Nashik Crime News)



'ती' हत्याच, संशयित ताब्यात


इगतपुरी तालुक्यातील (Igatpuri Taluka) सांजेगाव शिवारातील ‘हिरवी मिर्ची रिसॉर्ट’जवळ झालेल्या रुपाली निलेश पाटील (वय ३४) (Rupali Nilesh Patil) यांच्या संशयास्पद मृत्यू (Death Case) प्रकरणाचा वाडीवऱ्हे पोलिसांनी (Wadivarhe Police) अवघ्या काही तासांत उलगडा केला आहे. या घटनेत रुपाली यांची हत्या झाल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले असून, पोलिसांनी संशयित प्रियकर दीपक शिवाजी सैंदाणे (वय ४३) याला अटक केली आहे. (Nashik Crime News)



नेमकं प्रकरण काय ?


संशयित आरोपी दीपक सैंदाणे (Deepak Saindane) हा रुपाली पाटील यांना कारमधून फिरण्यासाठी इगतपुरीच्या सांजेगाव शिवारात (Sanjegaon Area) घेऊन जात होता. मात्र प्रवासादरम्यान दोघांमध्ये जोरदार भांडण झाले. भांडण इतके विकोपाला गेले की संतापाच्या भरात आरोपीने हिरवी मिर्ची रिसॉर्टच्या गेटसमोर रुपाली यांच्या अंगावर कार घालून त्यांना जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात गंभीर जखमी झालेल्या रुपाली यांचा मृत्यू झाला. संशयाची सुई दिपककडे असल्याने पोलिसांनी दिपकची कसून चौकशी सुरु केली. पोलिसांच्या सखोल चौकशीत आरोपी दीपक (Deepak Saindane) याने हत्येची कबुली दिली आहे. (Nashik Crime News)



पोलिसांची चक्रे वेगाने फिरली


घटनास्थळाची पाहणी, फॉरेन्सिक पथकाचा तपास (Forensic team), ई-साक्ष आणि प्रत्यक्षदर्शी साक्षीदार रुपेश दोंदे (Rupesh Donde) व सुरेश एर यांच्या जबाबांवरून आरोपीचा गुन्ह्यातील थेट सहभाग निष्पन्न झाला. या प्रकरणी वाडीवऱ्हे पोलीस ठाण्यात (Wadivarhe Police Station) आधी दाखल असलेल्या गुन्ह्यात कलमवाढ करून आरोपीला अटक (Arrest) करण्यात आली आहे. रुपाली पाटील (Rupali Nilesh Patil) यांच्या पश्चात पती, सात वर्षांची मुलगी, सासू-सासरे असा परिवार आहे. या घटनेची माहिती सिडको परिसरात पसरताच खळबळ उडाली आहे.

Comments
Add Comment

Cricket Match-Fixing : कॅनडावरील मॅच फिक्सिंगच्या आरोपांनंतर मुख्य प्रशिक्षक मॉन्टी देसाईंचा राजीनामा

नवी दिल्ली : कॅनडाच्या पुरुष क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक मॉन्टी देसाई यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. १

Maharashtra Politics : ‘संजय राऊतांना कितीही मिरच्या झोंबल्या तरी जगभरातून महाराष्ट्राचे कौतुक होणार’; भाजपचा टोला

मुंबई:  अमेरिकेचे राजदूत सर्जिओ गोर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कामाचे कौतुक केल्यावरून भाजपने

CM Devendra Fadnavis : कोरोनामुळे जोडीदार गमावलेल्या दत्तक मुलीचा मुख्यमंत्र्यांनी लावून दिला पुनर्विवाह

मुंबई : कोरोना काळात संकटात सापडलेल्या आणि तत्कालीन विरोधी पक्षनेते असताना दत्तक घेतलेल्या तरुणीचा पुनर्विवाह

10 Oldest Countries : जगातील १० सर्वात प्राचीन देश कोणते? इतिहासात याचं एकच उत्तर नाही!

जगातील सर्वात जुना देश कोणता? हा प्रश्न सोपा वाटतो… पण इतिहास त्याचं उत्तर तितकं सोपं देत नाही. कारण “देश किती

sajjan kumar passes away : १९८४ च्या शिखविरोधी दंगलीतील दोषी माजी काँग्रेस खासदार सज्जन कुमार यांचा वयाच्या ८० व्या वर्षी तिहार जेलमध्ये मृत्यू

नवी दिल्ली : १९८४ च्या भीषण शिखविरोधी दंगलीप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेले माजी काँग्रेस खासदार सज्जन

Pune School Van Fire : काळ आला होता पण...! पिंपरीत चालू स्कूल व्हॅनने अचानक घेतला पेट, सुदैवाने मोठी दुर्घटना टळली

पुणे :  पिंपरी-चिंचवडमध्ये एका खासगी स्कूल व्हॅनला अचानक आग लागल्याची घटना घडली. काही क्षणांतच आगीने रौद्र रूप