sajjan kumar passes away : १९८४ च्या शिखविरोधी दंगलीतील दोषी माजी काँग्रेस खासदार सज्जन कुमार यांचा वयाच्या ८० व्या वर्षी तिहार जेलमध्ये मृत्यू

नवी दिल्ली : १९८४ च्या भीषण शिखविरोधी दंगलीप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेले माजी काँग्रेस खासदार सज्जन कुमार (Sajjan Kumar) यांचे गुरुवारी वयाच्या ८० व्या वर्षी निधन झाले. दिल्लीच्या तिहार तुरुंगात शिक्षा भोगत असताना त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना तातडीने सफदरजंग रुग्णालयात दाखल करण्यात आले होते; मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप रुग्णालयाकडून स्पष्ट करण्यात आलेले नाही.



१९८४ च्या दंगलीतील मुख्य सूत्रधार


दिल्लीच्या राजकारणात जाट समाजाचा एक मोठा चेहरा म्हणून ओळखले जाणारे सज्जन कुमार हे ३१ ऑक्टोबर १९८४ रोजी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर उसळलेल्या शिखविरोधी दंगलीतील मुख्य चिथावणीखोर असल्याचे दिल्ली पोलिसांच्या तपासात समोर आले होते. इंदिरा गांधींच्या हत्येनंतर दिल्लीसह उत्तर भारतात उसळलेल्या दंगलीत हजारो शिख बांधवांची घरे, दुकाने आणि गुरुद्वारे जाळण्यात आले होते. या भीषण हिंसाचारात हजारो निष्पाप लोकांचा बळी गेला होता.



३० वर्षांनंतर कसा आवळला गेला फास ?


विशेष म्हणजे दंगलीच्या घटनेनंतर तब्बल ३० वर्षे सज्जन कुमार यांचे नाव या प्रकरणातून बाहेरच राहिले होते. सुरुवातीला स्थापन करण्यात आलेल्या अनेक तपास आयोगांच्या अहवालातही त्यांचा थेट उल्लेख नव्हता. परंतु, २०१५ मध्ये केंद्र सरकारने शिखविरोधी दंगलींच्या जुन्या बंद पडलेल्या फाईल्स पुन्हा उघडण्यासाठी 'विशेष तपास पथक' (SIT) स्थापन केले आणि तेथून सज्जन कुमार यांच्याविरोधात कायदेशीर फास आवळला गेला.



न्यायालयाचे खटले आणि जन्मठेपेची शिक्षा


२०१८ मध्ये दिल्ली उच्च न्यायालयाने पालम कॉलनी परिसरात पाच शिख नागरिकांच्या हत्येप्रकरणी सज्जन कुमार यांना प्रथम दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. यानंतर २०२५ मध्ये, १ नोव्हेंबर १९८४ रोजी दिल्लीच्या सरस्वती विहार भागात दोन शिख पुरुषांच्या हत्येप्रकरणी न्यायालयाने त्यांना पुन्हा जन्मठेपेची शिक्षा सुनावली. दरम्यान, जनकपुरी आणि विकासपुरी हिंसाचार प्रकरणातून पुराव्यांअभावी त्यांची निर्दोष मुक्तता झाली होती.



सज्जन कुमार यांची राजकीय कारकीर्द


सज्जन कुमार हे ७० च्या दशकापासून दिल्लीच्या राजकारणात सक्रिय होते. १९७७ मध्ये त्यांनी नगरसेवक म्हणून आपल्या राजकीय प्रवासाला सुरुवात केली. यानंतर १९८० पासून त्यांनी 'आऊटर दिल्ली' लोकसभा मतदारसंघातून तब्बल तीन वेळा काँग्रेस पक्षाचे खासदार म्हणून प्रतिनिधीत्व केले होते. अखेर आयुष्याचा शेवटचा काळ तुरुंगात घालवल्यानंतर ८० व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली.

Comments
Add Comment

Global Coast Guard Summit : फेब्रुवारी 2027मध्ये तटरक्षक दलाची पाचवी जागतिक शिखर परिषद; भारताकडे यजमानपद

नवी दिल्ली : भारतीय तट रक्षक दलाच्या स्वर्णिम जयंतीच्या निमित्ताने, भारत फेब्रुवारी 2027 मध्ये नवी दिल्ली इथे तट

Amit Shah On Vande Mataram : "काँग्रेसला लाज वाटली पाहिजे!" 'वंदे मातरम'वरून अमित शाहांचा हल्लाबोल!

नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी सरकारी कार्यक्रमांमध्ये 'वंदे मातरम' गायनाच्या नियमांचे पालन

iPhone 18 Launch Date Out ? : आयफोन १८ सिरीजची उत्सुकता शिगेला! कधी होणार ॲपलचा मोठा इव्हेंट ? वाचा सविस्तर

जगातील अव्वल तंत्रज्ञान कंपनी 'ॲपल' (Apple) आपल्या नव्या उपकरणांसाठी प्रसिद्ध आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही कंपनी

Martin Day Nithin Chand Guruvayur Wedding : तब्बल १० वर्षांनंतर पूर्ण झाली इच्छा; स्कॉटिश खासदार मार्टिन डे यांनी केरळच्या नितिन चंद यांच्यासोबत मंदिरात केले पारंपरिक लग्न

केरळ : स्कॉटलंडच्या संसद सदस्य (MSP) मार्टिन डे आणि केरळच्या नितिन चंद यांनी प्रसिद्ध गुरुवायूर श्रीकृष्ण मंदिरात

Cancer Vaccine : कॅन्सरवरील उपचारात मोठा चमत्कार! मॉडर्ना आणि मर्कची नवीन लस लवकरच बाजारात येण्याची शक्यता

कर्करोगाची गाठ पुन्हा न होण्यासाठी वैयक्तिककृत 'mRNA' लस ठरतेय प्रभावी; अंतिम चाचणीत मोठे यश कॅन्सर (कर्करोग) या

One Day One University Scheme : Gen Z सोबत थेट संवाद साधणार केंद्र सरकार; केंद्रीय मंत्र्यांची विद्यापीठांमध्ये भेट, ‘एक दिवस, एक विद्यापीठ’ योजनेची चर्चा

नवी दिल्ली : देशातील तरुण पिढी, विशेषतः Gen Z सोबत थेट संवाद वाढवण्यासाठी केंद्र सरकारकडून नवा उपक्रम राबवण्याची