Pune School Van Fire : काळ आला होता पण...! पिंपरीत चालू स्कूल व्हॅनने अचानक घेतला पेट, सुदैवाने मोठी दुर्घटना टळली

पुणे :  पिंपरी-चिंचवडमध्ये एका खासगी स्कूल व्हॅनला अचानक आग लागल्याची घटना घडली. काही क्षणांतच आगीने रौद्र रूप धारण केल्याने संपूर्ण व्हॅन जळून खाक झाली. सुदैवाने, घटनेच्या वेळी व्हॅनमध्ये एकही विद्यार्थी नसल्याने मोठी दुर्घटना टळली. (Pune News)


मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. स्कूल व्हॅन चालकाने विद्यार्थ्यांना इंदिरा शाळेत सुरक्षितपणे सोडल्यानंतर व्हॅन दुरुस्तीसाठी गॅरेजच्या दिशेने नेली. त्यावेळी गाडी चालवत असताना अचानक धूर येत असल्याचे चालकाच्या लक्षात आले. (Pimpri School Van)



धूर दिसताच चालकाने तातडीने व्हॅन रस्त्याच्या कडेला थांबवली. मात्र, काही क्षणांतच व्हॅनने पेट घेतला आणि आग वेगाने पसरली. पाहता पाहता संपूर्ण व्हॅन आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. आगीचे स्वरूप लक्षात येताच परिसरातील नागरिकांनीही घटनास्थळी धाव घेतली. (School Van Fire)


घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान आणि वाकड पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी पाण्याचा मारा करत आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र, तोपर्यंत व्हॅनचे मोठे नुकसान झाले होते. (Wakad Police)


दरम्यान, व्हॅनला आग लागली त्यावेळी त्यामध्ये विद्यार्थी नसल्याचे समोर आले आहे. चालकाने सर्व विद्यार्थ्यांना यापूर्वीच शाळेत सोडले होते. त्यामुळे या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झाली नाही.


व्हॅनला आग नेमकी कशामुळे लागली, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. प्राथमिक अंदाजानुसार शॉर्टसर्किटमुळे आग लागली असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, इतर कोणत्या कारणामुळे ही घटना घडली का, याचा तपास वाकड पोलीस करत आहेत. (Pimpri Chinchwad)

Comments
Add Comment

Chandrakant Patil : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना दरमहा २ हजार पॉकेटमनी ? उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचे सूतोवाच

आर्थिक अडचणींमुळे शैक्षणिक 'गळती' रोखण्याचा उद्देश मुंबई : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींसाठी राज्य

CM Devendra Fadnavis : कोरोनामुळे जोडीदार गमावलेल्या दत्तक मुलीचा मुख्यमंत्र्यांनी लावून दिला पुनर्विवाह

मुंबई : कोरोना काळात संकटात सापडलेल्या आणि तत्कालीन विरोधी पक्षनेते असताना दत्तक घेतलेल्या तरुणीचा पुनर्विवाह

Chhatrapati Sambhajinagar : "सॉरी आई-आप्पा, पुढच्या जन्मी नक्की डॉक्टर बनेन"; १९ वर्षीय तरुणाने शेवटची चिट्ठी लिहिली अन्...

छत्रपती संभाजीनगर : वैद्यकीय क्षेत्रात करिअर करण्याचे स्वप्न अपुरे राहिल्याच्या नैराश्यातून छत्रपती

Jalgaon : बुरहानपूर येथे २५.१७ कोटींचा रेल्वे उड्डाणपूल; भुसावळ-खंडवा मार्गिकेच्या भविष्यातील विस्ताराच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण प्रकल्प

Jalgaon : मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागामार्फत (Bhusawal Division of Central Railway) बुरहानपूर येथील लालबाग-खुनी भंडारा परिसरात रेल्वे व

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात २० ऑगस्टला पाऊस बरसणार; ४ जिल्ह्यांना हवामान खात्याचा यलो अलर्ट

मुंबई : सध्या राज्यात पावसाचा जोर काहीसा कमी असला तरी २० ऑगस्ट रोजी अनेक भागांत पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान

Energy and Nanotechnology : पुणे आणि मुंबई विद्यापीठांचा अनोखा उपक्रम; ऊर्जा आणि नॅनोटेकनॉलॉजीमध्ये संयुक्त एमटेक अभ्यासक्रम सुरू

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (SPPU) आणि मुंबई विद्यापीठ (MU) यांच्यातर्फे संयुक्त पदव्युत्तर तंत्रज्ञान