Jalgaon Crime : एकाकडे बंदूक, एकाकडे सूरी...पोलिसाच्याच घरावर दरोडा; पोलिसाने स्वतःला बाथरूममध्ये कोंडून घेतलं अन्....

Jalgaon Crime : जळगाव तालुक्यातील नशिराबाद येथे एक खळबळजनक घटना घडली आहे. एका पोलीस कर्मचाऱ्याच्या घरावरच दोन अज्ञात दरोडेखोरांनी सशस्त्र दरोडा टाकल्याची घटना बुधवारी घडली आहे. यावेळी या दरोडेखोराच्या हातात बंदूक आणि सूरी असल्याने परिस्थिती आणखी भीतीदायक निर्माण झाली होती. एका दरोडेखोराने तर पोलीस कर्मचाऱ्याच्या पत्नीच्या गळ्याला सुरी लावत घरातील रोकड आणि सोन्याचे दागिने काढून देण्याची धमकी दिली. यावेळी प्रसंगावधान राखत पोलिसाने स्वतःला बाथरूममध्ये कोंडून घेत डायल ११२ वर नियंत्रण कक्षाशी संपर्क साधला आणि मोठा अनर्थ टळला.



नेमकं प्रकरण काय ?


जळगाव तालुक्यातील नशिराबाद गावातील मुक्तेश्वरनगर परिसरात गणेश साहेबराव कोळी यांचे घर आहे. गणेश साहेबराव कोळी हे स्वतः पोलीस नाईक आहे. कोळी हे सध्या ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली येथील विष्णूनगर पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. नातेवाइकाचे निधन झाल्याने ते अंत्यसंस्कारासाठी नशिराबाद येथे आले होते. बुधवारी कुटुंबीयांसह घरी असताना रात्री साडेआठच्या सुमारास दोन दरोडेखोरांनी सशस्त्र घरात प्रवेश केला. घरात शिरताच एका दरोडेखोराने कोळी यांच्या पत्नीच्या गळ्याला थेट सुरी लावली. दुसऱ्याने हातातील बंदुकीचा धाक दाखवत घरातील सोन्याचे दागिने आणि रोकड काढून देण्याची मागणी केली. अचानक घरात घुसलेल्या सशस्त्र दरोडेखोरांमुळे कुटुंबीयांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. (Jalgaon Crime News)



...अन् मोठा अनर्थ टळला


दरम्यान, दरोड्याच्या वेळी गणेश कोळी यांच्या अंगावर सोने आणि हातात अंगठ्या होत्या. दरोडेखोरांचे लक्ष त्यांच्याकडे जाताच कोळी यांनी प्रसंगावधान राखत तातडीने स्वतःला बाथरूममध्ये कोंडून घेतले. त्यानंतर बाथरूममधूनच त्यांनी डायल ११२ या पोलिसांच्या आपत्कालीन क्रमांकावर संपर्क साधत घरात दरोडेखोर शिरल्याची माहिती दिली. पोलिसांना घटनेची माहिती दिल्याचे लक्षात येताच दरोडेखोरांनी बाथरूमचा दरवाजा तोडण्याचा प्रयत्न सुरू केला. परंत, प्रयत्न करूनही दरवाजा तुटला नाही. पोलीस यंत्रणा सतर्क झाल्याची कुणकुण दरोडेखोरांना लागताच अधिक वेळ न घालवता ते घरातून पसार झाले. (Jalgaon Crime News)



पोलिसांकडून अधिक तपास सुरू


यावेळी घरातील टेबलवर ठेवलेली गणेश कोळी यांच्या कारची चावी दरोडेखोरांच्या हाती लागल्याने कारची चावी घेऊन ते घराबाहेर पडून कारमधून भादली रस्त्याच्या दिशेने सुसाट निघून गेले.घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी दरोडेखोरांचा माग काढण्यास सुरुवात केली. पोलीस मागावर असल्याचे लक्षात आल्यानंतर दरोडेखोरांनी मन्यारखेडा शिवारात अंधाराचा फायदा घेत कार सोडून दिली. त्यानंतर दोघांनीही शेतातून पळ काढला. पोलिसांनी घटनास्थळी पोहचून सोडून दिलेली कार ताब्यात घेतली असून, दरोडेखोरांचा शोध घेण्यासाठी तपास सुरू करण्यात आला आहे.

Comments
Add Comment

Nashik Crime : प्रेमविवाहासाठी भोंदूबाबाच्या दारात गेली अन्...; नाशिकमध्ये खळबळ

Nashik Crime : नाशिकमध्ये आणखी एका नव्या भोंदूबाबाचा नवा प्रताप समोर आला आहे. प्रेमविवाहासाठी भोंदूबाबाच्या दारात

Sandeep Vanga vs Deepika Padukone : दीपिका पादुकोणमुळे ‘स्पिरीट’ची कथा फुटली ? ५-६ कोटींचा वाद अन् १०% चा वाटा; वांगा बंधूंचा दीपिका पादुकोणवर सनसनाटी आरोप

मुंबई : दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा (Sandeep Reddy Vanga) यांच्या आगामी ‘स्पिरीट’ (Spirit Movie) या बहुचर्चित चित्रपटाभोवतीचा वाद

Prithviraj Chavan : २०१४ मध्येच होता महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्याचा प्रस्ताव

- माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा दावा; उद्धव ठाकरे आणि शरद पवारांच्या पक्षाची होती योजना मुंबई :

BPL suffers : बीपीएलला ३१ कोटींचा फटका! यंदा स्पर्धा रद्द होण्याची शक्यता; भारत-बांगलादेश मालिकेच्या वेळापत्रकातही बदलाचे संकेत

बांगलादेश क्रिकेट जगतातून एक मोठी बातमी समोर येत आहे. बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे (BCB) अध्यक्ष तमीम इक्बाल यांनी

Eknath Shinde : 'एसटी'च्या ग्रुप बुकिंगसाठी लागणारे ३० टक्के अतिरिक्त शुल्क रद्द

- गणेशोत्सवासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा निर्णय; लाखो गणेश भक्तांना दिलासा मुंबई : गणेशोत्सवासाठी

Police Department : लोकसंख्या आणि गुन्हेगारीनुसार होणार पोलीस ठाण्यांची नव्याने रचना

- गृह विभागाकडून ‘अ’, ‘ब’, ‘क’ वर्गवारी; मुंबईसाठी ३६२ मनुष्यबळाची मर्यादा, सायबर ठाण्यांसाठी स्वतंत्र