Saturday, August 15, 2026

Marleshwar Temple : मार्लेश्वर मंदिरात तोकड्या व असभ्य कपड्यांमध्ये प्रवेशास बंदी

Marleshwar Temple : मार्लेश्वर मंदिरात तोकड्या व असभ्य कपड्यांमध्ये प्रवेशास बंदी

मार्लेश्वर देवस्थानचे पवित्र्य राखण्यासाठी देवस्थान ट्रस्टचा मोठा निर्णय

देवरूख : राज्यातील लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या संगमेश्वर तालुक्यातील मारळ येथील स्वयंभू मार्लेश्वर मंदिरात तोकड्या व असभ्य कपड्यांमध्ये प्रवेशास बंदी घालण्याचा मोठा निर्णय देवस्थान ट्रस्टने घेतला आहे. मार्लेश्वर देवस्थानचे पवित्र्य राखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असून भाविकांनी संस्कृतीला साजेसा पेहराव करूनच दर्शनासाठी यावे, असे देवस्थान ट्रस्टने स्पष्ट केले आहे. (Marleshwar Temple)

स्वयंभू मार्लेश्वर देवस्थान हे राज्यातील सुप्रसिद्ध असे तीर्थक्षेत्र आहे. मार्लेश्वरच्या दर्शनासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो भाविक मार्लेश्वर तीर्थक्षेत्री येत असतात. अशातच आता श्री मार्लेश्वर देवस्थान ट्रस्ट, मारळ यांनी मंदिराचे पवित्र्य आणि भारतीय संस्कृतीचे जतन करण्यासाठी मंदिर प्रवेशाबाबत एक महत्त्वपूर्ण नियमावली जारी केली आहे. यामध्ये अंगदर्शक, असभ्य, अशोभनीय व तोकडे वस्त्र (उदा. शॉर्ट्स, फाटलेल्या जिन्स, छोटे ड्रेसेस) आणि असात्विक वेशभूषा करून मंदिरात प्रवेश करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. भाविकांनी भारतीय संस्कृतीचे पालन करून पूर्ण आणि अंगभर वेशभूषेतच मार्लेश्वर देवाचे दर्शन घ्यावे. सर्व भाविक व पर्यटकांनी या नियमांचे तंतोतंत पालन करून मंदिर प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन देवस्थान ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे. (Marleshwar Temple)

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >