Rename Of Clean Mumbai Awareness Campaign : मुंबईत स्वच्छतेच्या कामांत आता 'प्रबोधन' नाही तर 'सेवा'

- ठाकरेंच्या काळातील स्वच्छ मुंबई प्रबोधन अभियान हे नाव बदलले


- भाजपच्या काळात आता बृहन्मुंबई स्वच्छता सेवा योजना


मुंबई (विशेष प्रतिनिधी)


मुंबईतील झोपडपट्टी, दाटीवाटीच्या आणि सघन वस्ती लोकसंख्या असलेल्या क्षेत्रांमध्ये स्वच्छतेचा स्तर उंचावण्यासाठी महानगरपालिकेने महत्त्वपूर्ण व लोकाभिमुख निर्णय घेतला आहे. सन २०१३ पासून राबविण्यात येत असलेल्या 'स्वच्छ मुंबई प्रबोधन अभियान' या योजनेचे पुनरावलोकन करुन, आता काळानुरूप सुधारित, अत्यंत प्रभावी आणि आधुनिक तंत्रज्ञानाची जोड असलेली 'बृहन्मुंबई स्वच्छता सेवा योजना' ही नवीन धोरणात्मक योजना राबविण्याचा प्रस्ताव गटनेत्यांच्या बैठकीमध्ये सादर करण्यात आला. त्यास तत्वतः मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे आतापर्यंत उबाठा शिवसेनेच्या काळात स्वच्छतेतील प्रबोधन गेले जात असले तरी भाजपच्या सत्ता काळात आता स्वच्छेत सेवा दिसून येणार आहे. यामध्ये प्रति गट मासिक आर्थिक सहाय्य हे ६ हजारांवरुन ११ हजार रुपये केले जाणार आहे. त्यामुळे महापालिकेच्या तिजोरीवरील या स्वच्छतेचा खर्च वार्षिक ७४.१७ कोटी रुपयांवरून १३६ कोटी रुपयांवर पोहोचला पोहोचणार आहे. (Rename Of Clean Mumbai Awareness Campaign)


मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्या अध्यक्षतेखाली, गटनेत्यांची सभा बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयातील महापौर दालनात मंगळवारी ११ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी पार पडली. त्यावेळी 'बृहन्मुंबई स्वच्छता सेवा योजना' विषयक प्रस्ताव सादर करण्यात आला. मुंबई महापालिकेच्यावतीने दत्तक वस्ती योजना बंद करून त्यात सुधारणा करत सन सन २०१३ पासून स्वच्छ मुंबई प्रबोधन अभियान ही योजना झोपडपट्टी क्षेत्रांमध्ये लोकसहभागातून स्वच्छता राखण्यासाठी राबविण्यात येत आहे. या अंतर्गत वस्तीतील अंतर्गत पायवाटांची स्वच्छता करणे, घरोघरी जाऊन कचरा संकलन करणे, सार्वजनिक कचरा संकलन केंद्राची स्वच्छता राखणे, वस्तीतील रस्त्यांची (२० फूट रुंदीपर्यंत) स्वच्छता करणे, शौचालयांची स्वच्छता करणे, अंतर्गत गटारांची स्वच्छता करणे तसेच स्वच्छतेबाबत प्रबोधन व जनजागृती करणे इत्यादी कामे एकत्रितपणे सोपविण्यात आली आहेत. मात्र या योजनेच्या अंमलबजावणीत अडचणी निर्माण होत असल्याचे वारंवार निदर्शनास आले आहे. (Rename Of Clean Mumbai Awareness Campaign)



सन २०१३ पासून या योजनेतील कामे करणा-या संस्थांना देण्यात येणा-या आर्थिक सहाय्याद्वारे आजपर्यंत कोणतीही वाढ न केल्याने, संस्थांना देण्यात येणारे आर्थिक सहाय्य कमी असल्यामुळे संस्थांमध्ये नाराजी आहे. तसेच खुल्या व बंदिस्त नाल्यांची तसेच अंतर्गत गटारांची स्वच्छता करण्यासाठी कुशल मनुष्यबळाची व विशेष अवजारांची आवश्यकता असते. मात्र अशी तांत्रिक स्वरूपाची कामे स्वच्छ मुंबई प्रबोधन अभियान (SMPA) योजनेतून करणे व्यवहार्य नाही. (Rename Of Clean Mumbai Awareness Campaign)


या सर्व अडचणींवर दीर्घ, सखोल विचार करून आणि स्थानिक लोकप्रतिनिधी व प्रभाग समित्यांच्या सूचनांचा विचार करून महानगरपालिकेने 'बृहन्मुंबई स्वच्छता सेवा योजना' ही नवीन सुधारित योजना आखली आहे. ही नवीन योजना नाविन्यपूर्ण व अभिनव आहे. तसेच स्थानिक पातळीवरील स्वच्छतेचा संपूर्ण चेहरामोहरा बदलून टाकणारी ठरेल, असा विश्वास आहे. 'बृहन्मुंबई स्वच्छता सेवा योजने'ची रचना अत्यंत नियोजनबद्ध करण्यात आली आहे. या योजनेत संस्थांचे मुख्य लक्ष इतर कामांत न भरकटता केवळ दैनंदिन घरगुती कचरा संकलन आणि अंतर्गत गल्ल्यांच्या झाडलोट व स्वच्छतेवरच केंद्रित राहील. (नाले व गटार स्वच्छतेसाठी विभाग स्तरावर स्वतंत्र तांत्रिक मनुष्यबळ उपलब्ध केले जाईल. तर सार्वजनिक शौचालयांचे व्यवस्थापन समुदाय आधारित संस्था (सीबीओ मार्फत स्वतंत्रपणे केले जाईल.) यासोबतच संस्थांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी त्यांचे मासिक आर्थिक सहाय्य प्रति युनिट रुपये सहा हजारांवरुन थेट रुपये अकरा हजारांवर करण्यात येणार आहे. एकूणच, यातून तळागाळातील स्वच्छता व्यवस्थेला योग्य आर्थिक पाठबळ देणार आहे. (Rename Of Clean Mumbai Awareness Campaign)



ही नवीन योजना पूर्णपणे पारदर्शक, उत्तरदायी आणि लोकाभिमुख बनवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. कामांच्या अद्ययावत (रिअल-टाईम) निरीक्षणासाठी जीपीएस आधारित मोबाईल अ‍ॅपचा वापर केला जाईल. नागरिकांना थेट तक्रार नोंदवण्यासाठी क्यू आर कोडची डिजिटल सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे, ज्यामुळे सामान्य नागरिकांचा सहभाग वाढेल. एवढेच नाही तर निष्काळजीपणा आढळल्यास दंडाची तरतूद करण्यात आली आहे. सलग तीन वेळा दंडनीय बाबींची पुनरावृत्ती झाल्यास संबंधित संस्थेस काळ्या यादीत टाकण्यात येणार आहे. याउलट, उत्कृष्ट कामकाज करणाऱ्या संस्थांना दरमहा रुपये २१ हजारांचे अतिरिक्त प्रोत्साहन अनुदान देऊन गौरविण्यात येणार आहे. (Rename Of Clean Mumbai Awareness Campaign)



योजनेची ठळक वैशिष्ट्ये :


मासिक आर्थिक सहाय्य : ६,००० वरून ११,००० रुपये :


मासिक खर्च : ६.१८ कोटी वरून ११.३४ कोटी रुपये :


वार्षिक खर्च : ७४.१७ कोटी वरून १३६ कोटी रुपये:


रहिवाशांचा ऐच्छिक सहभाग : २० वरून ५० रुपये :


दुकानांचा ऐच्छिक सहभाग : ५० वरून १०० रुपये :


उत्कृष्ट संस्थांसाठी मासिक प्रोत्साहन : पूर्वी नव्हते, आता २१,००० पर्यंत



युनिट निकष :


प्रति युनिट १५० कुटुंबे अथवा ७५० लोकसंख्या कायम (Rename Of Clean Mumbai Awareness Campaign)

Comments
Add Comment

Ghatkopar Landslide Accident : जखमी नागरिकांना ५० हजारांची मदत तर मृतांच्या वारसांना ४ लाख; महापौर रितू तावडे यांनी केली घोषणा

मुंबई : कुर्ला पश्चिमेतील अशोक नगर, टेकडी क्रमांक ३ येथे बुधवारी (१२ ऑगस्ट २०२६) पहाटेच्या सुमारास भूस्खलनाची

Practical Marathi knowledge for Drivers : प्रवासी वाहनचालकांना आता व्यवहारिक मराठी अनिवार्य! नियम मोडल्यास ३ महिन्यांपर्यंत परवाना निलंबित, पुढे कायमचा रद्द होणार

मुंबई : महाराष्ट्रात प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या व्यावसायिक वाहनचालकांसाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.

BMC : मुंबईतील ओसी नसलेल्या इमारतींच्या मार्गात अडथळा; स्थायी समितीत प्रस्ताव मंजुरीनंतर महापालिका सभागृहात लटकला

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईत अनेक विकासकांनी मंजुर आराखड्याची पुतर्ता न करता बांधकाम केले आहे, अशा

BMC News : मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या चार मुख्य जलवाहिन्यांचा एसआरए योजनेला अडथळा

- जलवाहिनी स्थलांतरीत करून योजना राबवली जाणार - महापालिका सुधार समितीत प्रस्ताव सादर मुंबई (विशेष

Vile Parle Fire : विले पार्ल्यात भीषण आग; अडीच वर्षांच्या चिमुकल्यासह दोघांचा मृत्यू, सहा जण जखमी

मुंबई : मुंबईतील विले पार्ले (पश्चिम) परिसरात मंगळवारी रात्री उशिरा भीषण आग लागून हृदयद्रावक दुर्घटना घडली. चर्च

Ghatkopar Landslide : धक्कादायक! घाटकोपर परिसरात गौशिया चाळीजवळ दरड कोसळली; दोघांचा मृत्यू तर ३ ते ४ नागरिक ढिगाऱ्याखाली अडकले

मुंबई : मुंबईत मुसळधार पावसाचा जोर कायम असतानाच कुर्ला परिसरातून मोठी आणि चिंताजनक घटना समोर आली आहे. घाटकोपर