Practical Marathi knowledge for Drivers : प्रवासी वाहनचालकांना आता व्यवहारिक मराठी अनिवार्य! नियम मोडल्यास ३ महिन्यांपर्यंत परवाना निलंबित, पुढे कायमचा रद्द होणार

मुंबई : महाराष्ट्रात प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या व्यावसायिक वाहनचालकांसाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. रिक्षा, टॅक्सी आणि ॲप-आधारित कॅबच्या चालकांना आता मराठी भाषेचे व्यवहारिक (Working) ज्ञान असणे अनिवार्य करण्यात आले आहे. महाराष्ट्र मोटार वाहन नियम, १९८९ मध्ये करण्यात आलेल्या सुधारणांद्वारे ही अट अधिक स्पष्ट करण्यात आली आहे. मराठीचे आवश्यक ज्ञान नसल्याचे आढळल्यास संबंधित चालकाच्या ड्रायव्हिंग लायसन्सवरील अधिकृतता निलंबित किंवा रद्द करण्याची तरतूद करण्यात आली आहे, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक (Minister Pratap Sarnaik) यांनी दिली.


या नव्या नियमांनुसार, नियमांचे पालन न करणाऱ्या चालकाची संबंधित अधिकृतता जास्तीत जास्त तीन महिन्यांपर्यंत निलंबित करता येणार आहे. त्यानंतरही नियमभंग सुरू राहिल्यास संबंधित अधिकृतता रद्द करण्याची कारवाई केली जाऊ शकते. (Practical Marathi knowledge for Drivers)



‘व्यवहारिक मराठी’चे ज्ञान आवश्यक :


शासनाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार Maharashtra Motor Vehicles (Amendment) Rules, 2026 अंतर्गत महाराष्ट्र मोटार वाहन नियम, १९८९ मध्ये विविध बदल करण्यात आले आहेत. नियम ४ मधील उपनियम (४) मध्ये ‘antecedents’ या शब्दांनंतर “and working knowledge of Marathi language” हे शब्द समाविष्ट करण्यात आले आहेत. त्यामुळे संबंधित अधिकृततेसाठी अर्ज करणाऱ्या व्यक्तीकडे आवश्यक पात्रतेसोबत मराठी भाषेचे कार्यकारी अर्थात व्यवहारिक ज्ञान असणे आवश्यक राहणार आहे. (Practical Marathi knowledge for Drivers)



ॲप-आधारित कॅब चालकांसाठीही नियम लागू :


नियम २२ मध्येही महत्त्वाची सुधारणा करण्यात आली आहे. ॲप-आधारित इलेक्ट्रॉनिक मीटर असलेल्या मोटार कॅबच्या अधिकृत चालकांसाठी स्वतंत्र तरतूद करण्यात आली आहे. नव्या नियम २२(३ए) नुसार, अशा मोटार कॅबच्या अधिकृत चालकाला मराठी भाषेचे व्यवहारिक ज्ञान असणे बंधनकारक असेल. चालकाकडे आवश्यक मराठी भाषेचे ज्ञान नसल्याचे आढळल्यास परवाना प्राधिकरणाला संबंधित चालकाविरोधात कारवाई करण्याचा अधिकार देण्यात आला आहे. (Practical Marathi knowledge for Drivers)


नियमभंग केल्यास काय कारवाई?



नियमांचे पालन न करणाऱ्या चालकावर पुढीलप्रमाणे कारवाई होऊ शकते :


- संबंधित ड्रायव्हिंग लायसन्सवरील अधिकृतता जास्तीत जास्त ३ महिन्यांपर्यंत निलंबित करता येईल.
- निलंबनानंतरही नियमांचे सातत्याने पालन न केल्यास संबंधित अधिकृतता रद्द करता येईल.
- मात्र, ही कारवाई करण्यापूर्वी परवाना प्राधिकरणाने कारणे लेखी स्वरूपात नोंदवणे आवश्यक राहणार आहे. (Practical Marathi knowledge for Drivers)



परमिटधारकांनाही मराठीची अट :


नवीन नियम केवळ चालकांपुरते मर्यादित नाहीत. नियम ७८ मध्येही सुधारणा करण्यात आली असून, संबंधित परमिटधारकाकडे मराठी भाषेचे व्यवहारिक ज्ञान असणे आवश्यक करण्यात आले आहे. याशिवाय ॲप-आधारित इलेक्ट्रॉनिक मीटर असलेल्या मोटार कॅबच्या परमिटच्या नूतनीकरणासाठीही ही अट लागू करण्यात आली आहे. (Practical Marathi knowledge for Drivers)



परमिट नूतनीकरणासाठीही मराठी आवश्यक :


नियम ८५ मध्ये करण्यात आलेल्या सुधारणेनुसार, ॲप-आधारित इलेक्ट्रॉनिक मीटर असलेल्या मोटार कॅबच्या परमिटचे नूतनीकरण करताना परमिटधारकाकडे मराठी भाषेचे व्यवहारिक ज्ञान असणे आवश्यक राहणार आहे. हे ज्ञान संबंधित प्राधिकरणाच्या समाधानकारक पातळीचे असणे आवश्यक असल्याचे अधिसूचनेत स्पष्ट करण्यात आले आहे. (Practical Marathi knowledge for Drivers)



‘महाराष्ट्र मोटार वाहन कायदा-२०२६’ नाही!


दरम्यान, या निर्णयाला ‘महाराष्ट्र मोटार वाहन कायदा-२०२६’ असे म्हणणे योग्य ठरणार नाही. अधिकृत अधिसूचनेत याचा उल्लेख “Maharashtra Motor Vehicles (Amendment) Rules, 2026”, अर्थात ‘महाराष्ट्र मोटार वाहन (सुधारणा) नियम, २०२६’ असा करण्यात आला आहे. हे बदल मोटार वाहन अधिनियम, १९८८ अंतर्गत महाराष्ट्र मोटार वाहन नियम, १९८९ मध्ये करण्यात आले आहेत. (Practical Marathi knowledge for Drivers)



नियमांमधील संदिग्धता दूर करण्याचा प्रयत्न :


परिवहन विभागाच्या म्हणण्यानुसार, यापूर्वीच्या नियमांमधील संदिग्धता किंवा काही त्रुटींमुळे अमराठी चालकांकडून मराठी भाषेच्या ज्ञानाबाबत टाळाटाळ केली जात असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. या विषयाच्या कायदेशीर पैलूंवर न्यायालयीन स्तरावरही चर्चा झाली होती. त्यामुळे सुधारित नियमांमुळे प्रवासी वाहतूक करणाऱ्या व्यावसायिक चालकांसाठी व्यवहारिक मराठीचे ज्ञान आवश्यक असल्याची अट अधिक स्पष्टपणे लागू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. (Practical Marathi knowledge for Drivers)



‘प्रवाशांशी संवादासाठी मराठी आवश्यक’ :


परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले की, या सुधारणांमुळे नियमांमधील संदिग्धता दूर होणार आहे. प्रवाशांशी संवाद साधणे, त्यांचे म्हणणे समजून घेणे आणि सुरक्षित व सुलभ प्रवास सुनिश्चित करण्यासाठी स्थानिक भाषेचे व्यवहारिक ज्ञान आवश्यक आहे. या नियमांमुळे रिक्षा, टॅक्सी आणि ॲप-आधारित कॅब चालकांमध्ये मराठी भाषेचे व्यवहारिक ज्ञान वाढण्यास मदत होईल आणि भविष्यात नियमांची अधिक प्रभावीपणे अंमलबजावणी करता येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. (Practical Marathi knowledge for Drivers)

Comments
Add Comment

Ghatkopar Landslide Accident : जखमी नागरिकांना ५० हजारांची मदत तर मृतांच्या वारसांना ४ लाख; महापौर रितू तावडे यांनी केली घोषणा

मुंबई : कुर्ला पश्चिमेतील अशोक नगर, टेकडी क्रमांक ३ येथे बुधवारी (१२ ऑगस्ट २०२६) पहाटेच्या सुमारास भूस्खलनाची

Rename Of Clean Mumbai Awareness Campaign : मुंबईत स्वच्छतेच्या कामांत आता 'प्रबोधन' नाही तर 'सेवा'

- ठाकरेंच्या काळातील स्वच्छ मुंबई प्रबोधन अभियान हे नाव बदलले - भाजपच्या काळात आता बृहन्मुंबई स्वच्छता सेवा

BMC : मुंबईतील ओसी नसलेल्या इमारतींच्या मार्गात अडथळा; स्थायी समितीत प्रस्ताव मंजुरीनंतर महापालिका सभागृहात लटकला

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईत अनेक विकासकांनी मंजुर आराखड्याची पुतर्ता न करता बांधकाम केले आहे, अशा

BMC News : मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या चार मुख्य जलवाहिन्यांचा एसआरए योजनेला अडथळा

- जलवाहिनी स्थलांतरीत करून योजना राबवली जाणार - महापालिका सुधार समितीत प्रस्ताव सादर मुंबई (विशेष

Vile Parle Fire : विले पार्ल्यात भीषण आग; अडीच वर्षांच्या चिमुकल्यासह दोघांचा मृत्यू, सहा जण जखमी

मुंबई : मुंबईतील विले पार्ले (पश्चिम) परिसरात मंगळवारी रात्री उशिरा भीषण आग लागून हृदयद्रावक दुर्घटना घडली. चर्च

Ghatkopar Landslide : धक्कादायक! घाटकोपर परिसरात गौशिया चाळीजवळ दरड कोसळली; दोघांचा मृत्यू तर ३ ते ४ नागरिक ढिगाऱ्याखाली अडकले

मुंबई : मुंबईत मुसळधार पावसाचा जोर कायम असतानाच कुर्ला परिसरातून मोठी आणि चिंताजनक घटना समोर आली आहे. घाटकोपर