Vile Parle Fire : विले पार्ल्यात भीषण आग; अडीच वर्षांच्या चिमुकल्यासह दोघांचा मृत्यू, सहा जण जखमी

मुंबई : मुंबईतील विले पार्ले (पश्चिम) परिसरात मंगळवारी रात्री उशिरा भीषण आग लागून हृदयद्रावक दुर्घटना घडली. चर्च रोडवरील सेंट झेवियर शाळेजवळ असलेल्या ‘शांता भवन’ या ११ मजली निवासी इमारतीतील दोन फ्लॅट्सना आग लागल्याने अडीच वर्षांच्या बालकासह दोघांचा मृत्यू झाला, तर अग्निशमन दलाच्या जवानासह सहा जण जखमी झाले आहेत. (Vile Parle Fire)



रात्री १० वाजता भडकली आग :


बॅप्टिस्टा रोडवरील स्टिल्ट प्लस ११ मजली शांता भवन इमारतीच्या ११ व्या मजल्यावरील फ्लॅट क्रमांक ११०१ आणि ११०२ मध्ये रात्री १०.०२ वाजता आग लागली. सुमारे ४,००० चौरस फूट परिसरात पसरलेल्या आगीत घरातील फर्निचर, एसी युनिट्स, इलेक्ट्रिक वायरिंग, सोफा, पलंग, फॉल्स सीलिंग आणि अन्य साहित्य जळून खाक झाले. (Vile Parle Fire)



बचावासाठी यंत्रणांची धाव :


घटनेची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दल, पोलीस, वीज विभाग, पालिकेचे कर्मचारी आणि १०८ रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या. धुराचे प्रचंड लोट आणि उष्णतेमुळे बचावकार्याला मोठे आव्हान निर्माण झाले. अग्निशमन दलाच्या अथक प्रयत्नांनंतर रात्री १२.२५ वाजता आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले, तर रात्री १ वाजेपर्यंत आग पूर्णपणे विझवण्यात यश आले. (Vile Parle Fire)



अडीच वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू :


या दुर्घटनेत जखमी झालेल्या नागरिकांना तातडीने नानावटी आणि कूपर रुग्णालयात हलवण्यात आले. नानावटी रुग्णालयात उपचारादरम्यान अबीर (२.५ वर्षे) आणि अंकिता (२३ वर्षे) यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. तर पार्थ (३२), हिरेन (६४), यशस्वी आणि अभिषेक यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. (Vile Parle Fire)



अग्निशमन जवानही जखमी :


आग विझवताना अग्निशमन दलाचे जवान मनोज सोनावणे (३०) आणि शिवम द्विवेदी (२९) हेही जखमी झाले. त्यांच्यावर कूपर रुग्णालयात उपचार करण्यात आले असून प्राथमिक उपचारानंतर दोघांनाही डिस्चार्ज देण्यात आला आहे. (Vile Parle Fire)



आगीचे कारण अद्याप अस्पष्ट :


आगीचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. प्राथमिक तपासानुसार शॉर्टसर्किटची शक्यता व्यक्त केली जात असली, तरी अग्निशमन दल आणि संबंधित यंत्रणांकडून सखोल चौकशी सुरू आहे. या दुर्घटनेनंतर विले पार्ले परिसरात शोककळा पसरली असून रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे. (Vile Parle Fire)




Comments
Add Comment

BMC : मुंबईतील ओसी नसलेल्या इमारतींच्या मार्गात अडथळा; स्थायी समितीत प्रस्ताव मंजुरीनंतर महापालिका सभागृहात लटकला

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईत अनेक विकासकांनी मंजुर आराखड्याची पुतर्ता न करता बांधकाम केले आहे, अशा

BMC News : मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या चार मुख्य जलवाहिन्यांचा एसआरए योजनेला अडथळा

- जलवाहिनी स्थलांतरीत करून योजना राबवली जाणार - महापालिका सुधार समितीत प्रस्ताव सादर मुंबई (विशेष

Ghatkopar Landslide : धक्कादायक! घाटकोपर परिसरात गौशिया चाळीजवळ दरड कोसळली; दोघांचा मृत्यू तर ३ ते ४ नागरिक ढिगाऱ्याखाली अडकले

मुंबई : मुंबईत मुसळधार पावसाचा जोर कायम असतानाच कुर्ला परिसरातून मोठी आणि चिंताजनक घटना समोर आली आहे. घाटकोपर

Raigad News : रायगडमधील निसर्ग चक्रीवादळग्रस्त कुटुंबांच्या पुनर्वसनाचा प्रश्न लवकरच सुटणार; सुधारित धोरणाला वेग

मुंबई : रायगड जिल्ह्यात निसर्ग चक्रीवादळामुळे बाधित झालेल्या कुटुंबांच्या पुनर्वसनाचा प्रलंबित प्रश्न लवकरच

Special Bus Service : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना दिलासा; महाड-माणगाव-पोलादपूरसाठी विशेष बससेवा

मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी मोठी दिलासादायक बातमी आहे.

Mumbai - Pune Missing Link : मुंबई - पुणे मिसिंग लिंक बंद राहणार, काय आहे कारण ? जाणून घ्या सविस्तर

मुंबई : यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावरील कनेक्टिंग लिंकचा मुंबई - पुणे मार्ग दुरुस्तीचे काम आणि मॉक ड्रिल या