मुंबई : कुर्ला पश्चिमेतील अशोक नगर, टेकडी क्रमांक ३ येथे बुधवारी (१२ ऑगस्ट २०२६) पहाटेच्या सुमारास भूस्खलनाची भीषण घटना घडली. डोंगरउतारावरील माती आणि ढिगाऱ्याचा मोठा भाग खालील २ ते ३ घरांवर कोसळल्याने जीवित आणि वित्तीय हानी झाली आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत दोन मृतदेह बाहेर काढण्यात आले असून, दोन जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. (Ghatkopar Landslide Accident)
घटनेची माहिती मिळताच मुंबईच्या महापौर रितू तावडे (Mayor Ritu Tawde) यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी बचावकार्याची पाहणी करत संबंधित अधिकाऱ्यांकडून परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच दुर्घटनेतील पीडित कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.
मृतांच्या वारसांना ४ लाख, जखमींना ५० हजारांची मदत :
या दुर्घटनेत प्राण गमावलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या वारसाला ४ लाख रुपयांची तातडीची आर्थिक मदत देण्याची घोषणा महापौर रितू तावडे यांनी केली आहे. तसेच जखमी झालेल्या प्रत्येक व्यक्तीला वैद्यकीय उपचारासाठी ५० हजार रुपयांची मदत देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. महापौरांनी घटनास्थळी उपस्थित सर्व यंत्रणांना बचावकार्य अधिक वेगाने आणि योग्य समन्वयाने करण्याचे निर्देश दिले. (Ghatkopar Landslide Accident)
मुंबई : महाराष्ट्रात प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या व्यावसायिक वाहनचालकांसाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. रिक्षा, टॅक्सी आणि ॲप-आधारित कॅबच्या ...
घटनास्थळी बचावकार्य युद्धपातळीवर :
भूस्खलन झालेल्या ठिकाणी पोहोचण्याचा मार्ग अत्यंत अरुंद आहे. या मार्गावरून एका वेळी केवळ एकच व्यक्ती जाऊ शकते. त्यामुळे बचाव पथकांसमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे.ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांचा शोध घेण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी, कर्मचारी आणि कामगार, मुंबई अग्निशमन दल, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF), मुंबई पोलीस आणि १०८ रुग्णवाहिका यांच्यासह विविध यंत्रणा घटनास्थळी कार्यरत आहेत. (Ghatkopar Landslide Accident)
ढिगाऱ्याखाली आणखी नागरिक अडकले असल्याची शक्यता :
प्राथमिक माहितीनुसार, आतापर्यंत दोन मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत, तर दोन जखमींना उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. मात्र, ढिगाऱ्याखाली आणखी कोणी अडकले आहे का, याचा शोध घेण्यासाठी बचावकार्य सुरू आहे. दरम्यान, प्रशासनाकडून संपूर्ण परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत असून बचावकार्याला गती देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. (Ghatkopar Landslide Accident)
मुंबई : मुंबईतील विले पार्ले (पश्चिम) परिसरात मंगळवारी रात्री उशिरा भीषण आग लागून हृदयद्रावक दुर्घटना घडली. चर्च रोडवरील सेंट झेवियर शाळेजवळ असलेल्या ...
वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी उपस्थित :
महापौर रितू तावडे यांच्या पाहणीवेळी प्रभाग समिती अध्यक्ष विजयेंद्र शिंदे, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अविनाश ढाकणे, एल विभागाचे सहायक आयुक्त (प्रभारी) अनिल जाधव यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते. भूस्खलनामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, बचावकार्य पूर्ण होईपर्यंत प्रशासनाकडून परिस्थितीवर लक्ष ठेवले जात आहे. (Ghatkopar Landslide Accident)