BMC News : मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या चार मुख्य जलवाहिन्यांचा एसआरए योजनेला अडथळा

- जलवाहिनी स्थलांतरीत करून योजना राबवली जाणार


- महापालिका सुधार समितीत प्रस्ताव सादर


मुंबई (विशेष प्रतिनिधी)


वडाळा येथून जाणाऱ्या महापालिकेच्या चार प्रमुख जलवाहिन्या आता झोपडपट्यांच्या पुनर्विकास योजनेत अडथळा ठरत येथील सुमारे २ झोपडीधारकांचे पुनर्वसन करण्यासाठी येथील सर्व जलवाहिनी काढून बाजुला स्थलांतरीत केल्या जाणार आहे. विशेष म्हणजे या जलवाहिन्या स्थलांतरीत या संबंधित विकासक स्वखर्चातून करणार आहे. परंतु जिथे जलवाहिनी लगतच्या झोपड्यांना हटवून त्यातील पात्र कुटुंबांचे पुनर्वसन केले जात असताना दुसरीकडे जलअभियंता विभागाच्या अखत्यारितील भूखंडावरील झोपड्यांच्या पुनर्वसनासाठी जलवाहिनीची काढून अन्य जागी स्थलांतरीत करण्याची वेळ आली आहे. (BMC News)



मुंबई महापालिकेच्या सुधार समितीच्या पटलावर याबाबतचा प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवण्यात आला आहे. वडाळा येथील मिठागराच्या जागेवरील पंचशील सहकारी गृहनिर्माण संस्थेच्यावतीने या जागेवर असणाऱ्या सुमारे २२०० झोपडीधारकांना झोपडपट्टी पुनर्वसन योजनेअंतर्गत लाभ देवून येथील नगर भू क्रमांक ३ भाग या महापालिकेच्या मालकीचा व जलअभियंता खात्याच्या अखत्यारितील या भूभागावरील अस्तित्वातील चार मुख्य जलवाहिनी या आय आय टी बॉम्बे या तांत्रिक सल्लागार यांच्या तांत्रिक सूचनेनुसार लगतच्या बाजुला स्थलांतरीत करून उर्वरीत रिक्त होणाऱ्या जागेवर विकासकास झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबवण्याकरता महापालिकेची जागा देण्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र देण्याचा प्रस्तावाला सुधार समिती व महापालिकेची मंजुरी मागितली आहे. (BMC News)


या भूखंडाचे एकूण क्षेत्रफळ हे ३६,७१६.८४ चौरस मीटर एवढे आहे. या भूभागावर १२०० मि.मी व्यासाची(जुनी तानसा मुख्य), १२०० मि.मी व्यासाची(नवीन तानसा मुख्य) ८०० मि.मी व्यासाची (विहार मुख्य) १८०० मि.मी व्यासाची( मुंबई दोन) या अस्तित्वातील मुख्य जलवाहिन्या आहेत. या जलवाहिन्या आता झोपडपट्टी पुनर्वसन योजनेत अडथळा ठरत असल्याने त्या बाजुच्या जागेवर स्थलांतरीत करून त्याठिकाणच्या झोपडपट्टीचा विकास करण्यात येणार आहे. (BMC News)



कोणत्या जलवाहिनीतून कोणत्या विभागाला होतो पाणी पुरवठा :


-१२०० मि.मी व्यासाची(जुनी तानसा मुख्य), १२०० मि.मी व्यासाची(नवीन तानसा मुख्य) :


जल वाहिनी सकाळी ४ ते १० दरम्यान एम/पश्चिम विभाग येथील टिळक नगर, सहकार नगर, एल विभागातील टिळक नगर टर्मिनल येथील झोपडपट्टी, एफ/दक्षिण येथील शहर दक्षिण क्षेत्र, एफ/उत्तर येथील शहर उत्तर क्षेत्र परिसरात पाणी पुरवठा


-८०० मि.मी व्यासाची (विहार मुख्य): एल विभाग येथील कुर्ला दक्षिण पुर्व क्षेत्रास आणि एम/पश्चिम येथील भक्ती पार्क क्षेत्रास दुपारी ४.३० वाजे पासुन सकाळी २ वाजेपर्यंत पाणी पुरवठा करतात


- १८०० मि.मी व्यासाची( मुंबई दोन) : तेथुन पुण वेळ फॉस मेरी आणि भंडारवाडा जलाशयास व दक्षिण मुंबई शहरास थेट पाणी पुरवठा करण्यात येतो.

Comments
Add Comment

Practical Marathi knowledge for Drivers : प्रवासी वाहनचालकांना आता व्यवहारिक मराठी अनिवार्य! नियम मोडल्यास ३ महिन्यांपर्यंत परवाना निलंबित, पुढे कायमचा रद्द होणार

मुंबई : महाराष्ट्रात प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या व्यावसायिक वाहनचालकांसाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.

Rename Of Clean Mumbai Awareness Campaign : मुंबईत स्वच्छतेच्या कामांत आता 'प्रबोधन' नाही तर 'सेवा'

- ठाकरेंच्या काळातील स्वच्छ मुंबई प्रबोधन अभियान हे नाव बदलले - भाजपच्या काळात आता बृहन्मुंबई स्वच्छता सेवा

BMC : मुंबईतील ओसी नसलेल्या इमारतींच्या मार्गात अडथळा; स्थायी समितीत प्रस्ताव मंजुरीनंतर महापालिका सभागृहात लटकला

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईत अनेक विकासकांनी मंजुर आराखड्याची पुतर्ता न करता बांधकाम केले आहे, अशा

Vile Parle Fire : विले पार्ल्यात भीषण आग; अडीच वर्षांच्या चिमुकल्यासह दोघांचा मृत्यू, सहा जण जखमी

मुंबई : मुंबईतील विले पार्ले (पश्चिम) परिसरात मंगळवारी रात्री उशिरा भीषण आग लागून हृदयद्रावक दुर्घटना घडली. चर्च

Ghatkopar Landslide : धक्कादायक! घाटकोपर परिसरात गौशिया चाळीजवळ दरड कोसळली; दोघांचा मृत्यू तर ३ ते ४ नागरिक ढिगाऱ्याखाली अडकले

मुंबई : मुंबईत मुसळधार पावसाचा जोर कायम असतानाच कुर्ला परिसरातून मोठी आणि चिंताजनक घटना समोर आली आहे. घाटकोपर

Raigad News : रायगडमधील निसर्ग चक्रीवादळग्रस्त कुटुंबांच्या पुनर्वसनाचा प्रश्न लवकरच सुटणार; सुधारित धोरणाला वेग

मुंबई : रायगड जिल्ह्यात निसर्ग चक्रीवादळामुळे बाधित झालेल्या कुटुंबांच्या पुनर्वसनाचा प्रलंबित प्रश्न लवकरच