Raj Thackeray Devendra Fadnavis : मनसे अध्यक्ष राज ठाकरे अचानक ‘वर्षा’वर! CM फडणवीसांसोबत बंद दाराआड चर्चा; मुंबईच्या राजकारणात मोठी खळबळ

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात आज सकाळपासून एका भेटीची जोरदार चर्चा सुरू आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी भेट घेतली. सकाळी सुमारे ८.२० वाजता राज ठाकरे यांचा ताफा ‘वर्षा’वर दाखल झाला. यावेळी मुंबई क्रिकेट असोसिएशनचे (MCA) अध्यक्ष अजिंक्य नाईक हेही राज ठाकरे यांच्यासोबत असल्याची माहिती आहे.


राज ठाकरे आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्यात बंद दाराआड चर्चा सुरू असल्याने या भेटीमागे नेमका विषय काय, याबाबत राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. (Raj Thackeray Devendra Fadnavis)



भेट पूर्वनियोजित असल्याची माहिती :


राज ठाकरे अचानक ‘वर्षा’वर पोहोचल्याने ही भेट ऐनवेळी ठरली असल्याचे प्रथमदर्शनी वाटत असले, तरी सूत्रांच्या माहितीनुसार ही बैठक पूर्वनियोजित होती. दोन दिवसांपूर्वीच या भेटीचे नियोजन करण्यात आले होते, अशी माहिती समोर आली आहे. त्यामुळे या भेटीला सध्या सुरू असलेल्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. (Raj Thackeray Devendra Fadnavis)



अजिंक्य नाईक सोबत असल्याने चर्चांना वेगळे वळण :


या भेटीमध्ये MCA अध्यक्ष अजिंक्य नाईक यांची उपस्थिती लक्षवेधी ठरली आहे. त्यामुळे ही बैठक केवळ राजकीय विषयांपुरती मर्यादित नसून मुंबईतील क्रीडा आणि विशेषतः क्रिकेटशी संबंधित प्रश्नांवरही चर्चा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दादर येथील ऐतिहासिक छत्रपती शिवाजी पार्क मैदानाची पुनर्रचना, क्रीडा सुविधा, क्रिकेटपटूंसाठी आवश्यक पायाभूत सुविधा आणि खेळाडूंच्या विविध प्रश्नांवर या बैठकीत चर्चा होऊ शकते, अशी शक्यता आहे. (Raj Thackeray Devendra Fadnavis)



याआधीही झाली होती फडणवीस-राज ठाकरे भेट :


मुंबई महापालिका निवडणुकीच्या आधीही राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यावेळी ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या आणि संभाव्य राजकीय युतीच्या चर्चांना उधाण आले होते. मात्र, त्यावेळी झालेली भेट मुंबईतील विविध प्रश्नांवर असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर या चर्चांना काही प्रमाणात पूर्णविराम मिळाला होता. दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी यापूर्वी उद्धव ठाकरे यांच्यासोबत आघाडी करत मुंबई महापालिका निवडणूक लढवली होती. ठाकरे बंधूंना अपेक्षित राजकीय यश मिळाले नसले, तरी या आघाडीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नवीन समीकरणांची चर्चा सुरू झाली. (Raj Thackeray Devendra Fadnavis)



राजकीय भेट की मुंबईतील प्रश्नांवर चर्चा?


एकीकडे राज ठाकरे यांनी सत्ताधारी महायुती आणि केंद्र सरकारच्या धोरणांवर टीका केली आहे. अशा परिस्थितीत राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ‘वर्षा’वरील भेट राजकीयदृष्ट्या महत्त्वाची मानली जात आहे. मात्र, अजिंक्य नाईक यांच्या उपस्थितीमुळे छत्रपती शिवाजी पार्कसह मुंबईतील क्रीडा सुविधांबाबतची चर्चा हा बैठकीचा प्रमुख विषय असण्याची शक्यता अधिक असल्याचे सांगितले जात आहे. (Raj Thackeray Devendra Fadnavis)


आता या बैठकीनंतर दोन्ही नेत्यांकडून नेमकी कोणती माहिती समोर येते आणि या भेटीचा राजकीय अर्थ काय काढला जातो, याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. (Raj Thackeray Devendra Fadnavis)

Comments
Add Comment

Practical Marathi knowledge for Drivers : प्रवासी वाहनचालकांना आता व्यवहारिक मराठी अनिवार्य! नियम मोडल्यास ३ महिन्यांपर्यंत परवाना निलंबित, पुढे कायमचा रद्द होणार

मुंबई : महाराष्ट्रात प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या व्यावसायिक वाहनचालकांसाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.

Rename Of Clean Mumbai Awareness Campaign : मुंबईत स्वच्छतेच्या कामांत आता 'प्रबोधन' नाही तर 'सेवा'

- ठाकरेंच्या काळातील स्वच्छ मुंबई प्रबोधन अभियान हे नाव बदलले - भाजपच्या काळात आता बृहन्मुंबई स्वच्छता सेवा

BMC : मुंबईतील ओसी नसलेल्या इमारतींच्या मार्गात अडथळा; स्थायी समितीत प्रस्ताव मंजुरीनंतर महापालिका सभागृहात लटकला

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईत अनेक विकासकांनी मंजुर आराखड्याची पुतर्ता न करता बांधकाम केले आहे, अशा

BMC News : मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या चार मुख्य जलवाहिन्यांचा एसआरए योजनेला अडथळा

- जलवाहिनी स्थलांतरीत करून योजना राबवली जाणार - महापालिका सुधार समितीत प्रस्ताव सादर मुंबई (विशेष

Actor Prakash Raj : अभिनेते प्रकाश राज यांचा SIR वरचा दावा खोटा? निवडणूक आयोगाने दाखवला BLOचा व्हिडिओ; म्हणाले "जुन्या पत्त्यावर..."

नवी दिल्ली : अभिनेता प्रकाश राज (Actor Prakash Raj) आपल्या वक्तव्यांमुळे अनेकदा चर्चेत असतात. आता कर्नाटकमधील Special Intensive Revision (SIR)

Vile Parle Fire : विले पार्ल्यात भीषण आग; अडीच वर्षांच्या चिमुकल्यासह दोघांचा मृत्यू, सहा जण जखमी

मुंबई : मुंबईतील विले पार्ले (पश्चिम) परिसरात मंगळवारी रात्री उशिरा भीषण आग लागून हृदयद्रावक दुर्घटना घडली. चर्च