महाराष्ट्र : ऑगस्टच्या सुरुवातीला काही दिवस विश्रांती घेतल्यानंतर राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढला आहे. कोकण किनारपट्टी, घाटमाथा आणि राज्यातील काही भागांमध्ये आज मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुणे जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर अतिमुसळधार पावसाचा धोका असल्याने ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरीसह काही जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. (Maharashtra Weather Update)
हवामान विभागाच्या ताज्या अंदाजानुसार, आज राज्यातील काही भागांत मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. नागरिकांनी विशेषतः घाटमाथा आणि दरडप्रवण भागात सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. (Maharashtra Weather Update)
पुण्याच्या घाटमाथ्यावर ऑरेंज अलर्ट :
पुणे जिल्ह्याच्या घाटमाथा परिसरात आज जोरदार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. काही ठिकाणी कमी वेळेत मोठ्या प्रमाणात पाऊस होण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने सतर्कता बाळगण्याच्या सूचना दिल्या आहेत. घाटमाथ्यावर पावसाचा जोर वाढल्यास दरड कोसळणे, रस्त्यांवर पाणी साचणे आणि वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता असते. त्यामुळे नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे. (Maharashtra Weather Update)
मुंबईसह या भागांना यलो अलर्ट :
हवामान विभागाच्या माहितीनुसार, ठाणे, मुंबई, पालघर, रायगड, रत्नागिरी, जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि अहिल्यानगर या भागांत काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. याशिवाय नाशिक, सातारा आणि कोल्हापूरच्या घाटमाथ्यावरही मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. (Maharashtra Weather Update)
पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम?
राज्यात एकाच वेळी अनेक हवामान प्रणाली सक्रिय झाल्याने पावसाचा जोर वाढल्याचे हवामान तज्ज्ञांचे म्हणणे आहे. मॉन्सूनचा आस, मध्य भारतातील कमी दाबाचे क्षेत्र आणि बंगालच्या उपसागरातील बदलती हवामानस्थिती यामुळे महाराष्ट्रात पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. वायव्य बंगालच्या उपसागरात चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झाली असून, पश्चिम बंगाल आणि ओडिशाच्या किनाऱ्यालगत नवीन कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील काही दिवस राज्यातील विविध भागांत पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. (Maharashtra Weather Update)
ताम्हिणी परिसरात ५० मिमी पाऊस :
मंगळवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत ताम्हिणी-तांबडी परिसरात ५० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. त्याच कालावधीत सोलापूर येथे राज्यातील सर्वाधिक ३४ अंश सेल्सिअस तापमान, तर महाबळेश्वर येथे सर्वात कमी १८ अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आले. (Maharashtra Weather Update)
नवी दिल्ली : एअर इंडियाच्या (Air India) फुकेट-दिल्ली विमानाशी संबंधित तपासात नवी माहिती समोर आली आहे. 4 ऑगस्ट रोजी AI-2379 या विमानाने फुकेटहून दिल्लीकडे येत ...
सकाळच्या Nowcast मध्येही पावसाचा इशारा :
१२ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ७ वाजता जारी करण्यात आलेल्या Nowcast Warning नुसार, ठाणे, मुंबई, रत्नागिरी, जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक, पालघर, छत्रपती संभाजीनगर आणि अहिल्यानगर येथे काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान, विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यांसह पाऊस होण्याची शक्यता असलेल्या भागातील नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. (Maharashtra Weather Update)