Monday, August 10, 2026

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींचा जुलै महिन्याचा हप्ता लवकरच खात्यात जमा होणार, नाहीतर 'या' सणाच्या मुहूर्तावर सरकारकडून धमाकेदार ओवाळणी!

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींचा जुलै महिन्याचा हप्ता लवकरच खात्यात जमा होणार, नाहीतर 'या' सणाच्या मुहूर्तावर सरकारकडून धमाकेदार ओवाळणी!

मुंबई : 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने'च्या पात्र लाभार्थी महिलांसाठी अत्यंत आनंदाची आणि महत्त्वाची बातमी आली आहे. जुलै महिन्याच्या १५०० रुपयांच्या हप्त्याची वाट पाहणाऱ्या पात्र महिलांची प्रतीक्षा आता संपणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या आठवड्यात म्हणजेच; साधारणपणे १५ ऑगस्टपर्यंत सर्व लाभार्थी व पात्र महिलांच्या बँक खात्यात जुलै महिन्याच्या हप्त्याची रक्कम जमा केली जाण्याची पुरेपूर शक्यता आहे. (Ladki Bahin Yojana)

येत्या मंगळवारी होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत लाडक्या बहिणींच्या निधीचे थेट हस्तांतरण करण्याबाबतचा अंतिम निर्णय घेतला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यापूर्वी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जून महिन्याचा हप्ता १५ जुलै रोजी; पात्र महिलांच्या खात्यात वर्ग करण्यात आला. तसेच दर महिन्याच्या १० तारखेला लाडक्या बहिणींच्या हप्त्याचा निधी त्यांच्या खात्यात जमा करण्यात येईल असा निर्णय शासनातर्फे जारी करण्यात आला असून त्याप्रमाणे महिलांच्या खात्यात हा निधी वर्ग केला जात आहे.(Ladki Bahin Yojana)

लाडक्या बहिणींना मिळणार रक्षाबंधनाला ३००० रुपयांची ओवाळणी...

योग्य पद्धतीने आखणी करूनही; जर काही कारणास्तव १८ ऑगस्टपर्यंत जुलै महिन्याचा हप्ता खात्यात जमा झाला नाही तर, थेट रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर लाडक्या बहिणींना जुलै आणि ऑगस्ट मिळून एकत्रित ३००० रुपयांचा हप्ता बँक खात्यात जमा करण्यात येण्याची शक्यता आहे. सरकारी सूत्रांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे, राज्यातील सुमारे १ कोटी ६६ लाख पात्र महिलांच्या खात्यात १५ ऑगस्ट ते १८ ऑगस्ट या कालावधीत जुलै महिन्याचा हप्ता टप्प्याटप्प्याने जमा केला जाईल.(Rakshabandhan)

ई-केवायसीमुळे ८० लाख लाडक्या बहिणी अपात्र असल्याचे उघड...

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिलांना आर्थिक मदत म्हणून आखलेली प्रणाली असली, तरी काही महिलांनी निकषांनुसार अपात्र असूनही विनाकारण या योजनेत नाव नोंदणी केली. आता याच महिला ई-केवायसी प्रक्रियेत अपात्र ठरल्या आहेत. सुमारे ८० लाख महिला अपात्र असल्याचे आढळले आहे. इथून पुढे या महिलांना 'लाडकी बहीण योजनेचा' कोणताही लाभ मिळणार नाही. ई - केवायसी पूर्ण केलेल्या पात्र लाभार्थी सुमारे १ कोटी ६६ लाख महिलांनाच लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार आहे. (Ekyc)

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >