Monday, August 10, 2026

Accident News : धुळे-सोलापूर मार्गावर भीषण अपघात, पोलिसाचा मृत्यू

Accident News : धुळे-सोलापूर मार्गावर भीषण अपघात, पोलिसाचा मृत्यू

Dhule Solapur Accident : धुळे-सोलापूर महामार्गावर कन्नड शहराजवळ भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. सोमवारी मध्यरात्री साडेबारा वाजेच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात एका पोलीस कर्मचाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. संभाजी विश्वनाथ कांबळे (वय ५२) असे मृत कर्मचाऱ्याचे नाव असून, ते माजी सैनिक होते.

नेमकं काय घडलं ?

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, ५२ वर्षीय संभाजी विश्वनाथ कांबळे (Sambhaji Vishwanath Kamble) सैन्य दलातून निवृत्त झाल्यानंतर गेल्या वर्षापासून नंदुरबार येथील पोलीस अधीक्षक (एसपी) कार्यालयात लिपिक पदावर कार्यरत होते. सोमवारी मध्यरात्री ते नंदुरबारहून आपल्या MH 20 HH 3687 या कारने छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) येथील घराकडे जात होते. मात्र याठिकाणी त्यांच्यावर काळाने घाला घातला.

संभाजी कांबळे यांचा जागीच मृत्यू

धुळे-सोलापूर महामार्गावरून (Dhule-Solapur Highway) जात असताना कन्नड शहराजवळ सुरू असलेल्या उड्डाणपूल व सर्व्हिस रोडच्या कामाचा मध्यरात्रीच्या अंधारात अंदाज न आल्याने, त्यांची कार थेट दुभाजक (डिवायडर) तोडून सर्व्हिस रोडवरील मातीच्या ढिगाऱ्यात जाऊन अडकली. ​हा अपघात इतका भीषण होता की, गाडीमध्येच कांबळे यांचा जागीच मृत्यू झाला...

कन्नड शहर पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद

घटनेची माहिती मिळताच कन्नड शहर पोलिसांनी (Kannad City Police) तत्काळ घटनास्थळी धाव घेत त्यांना कारबाहेर काढले व कन्नड ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, तेथील वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रवीण कांबळे (Dr. Pravin Kamble) यांनी तपासाअंती त्यांना मृत घोषित केले. या घटनेनं कुटुंबावर शोककळा पसरली आहे. याप्रकरणी कन्नड शहर पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >